आश्वी । झुंजार न्यूज

” आपल्या नेत्यावर विरोधकांकडून झालेल्या आरोपाचे उत्तर देण्यापेक्षा त्यांनी जेवढे आरोप केले तेवढ्ये  डोल प्रकरण , रेशन कार्ड व गोर – गरिबांना धान्य मिळवून देण्यासाठी जो कार्यकर्ता काम करेल तो सच्या कार्यकर्ता होय ” हा कानमंत्र देत डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की , आम्हाला घर बसणारा कार्यकर्तो नको तर माणसांच्या कल्याणकारी धोरण ठेवणारा कार्यकर्ता हवा बाळासाहेब विखे यांची आरोपाला – प्रतिआरोप करण्यापेक्षा गोर गरिबांच्या कल्याणकारी कामे करण्याची संस्कृती असल्यानेच स्व:खर्चातून सामाजिक कार्य करण्याचे धोरण असल्याचे मत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले . 

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु॥ येथील ग्रामिण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर , भगवानराव इलग , भाऊराव गायकवाड , संदिपराव घुगे , गोकूळ दिघे , संरुनाथ उंबरकर , सचिन शिंदे , पप्पू गाढे , गिताराम तांबे , शांताराम जोरी , अनिल म्हसे ,  अशोकराव ज-हाड , सौ रोहीनीताई निघुते , सौ कांचनताई मांढरे , मच्छिद्र पा थेटे , निवृत्ती पा सांगळे , पोपटराव वाणी , जेहूरभाई शेख , सुनिल मुन्तोडे , दिपक रक्टे , सतिष जोशी , विलास कदम , अनिल म्हसे , प्रकाश शिंदे आदीसह हजारोच्या सख्येने महीला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या दरम्यान प्राथमिक स्वरूपात महिला बचत गटांना धनादेश, स्टॉल तसेच फूड प्रोसेसिंग साहित्याचे वितरण करण्यात करण्यात आले. 
खासदार विखे म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने बचत गटातील महिलांना फूड प्रोसेसिंग व स्टॉल वाटप करण्यात आले आणि या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले. पालकमंत्र्यांनी ५० कोटी रुपयेची तरतूद करुन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे .

यावेळी डॉ विखे पाटील पुढे म्हणाले की , दीड दोन वर्षांपूर्वी आलेल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण प्रामाणिक आणि नैतिकतेने तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात कामाचा सपाटा सुरू केला आहे. आजपर्यंत जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून 500 बचत गटांना स्वयंरोजगारासाठी विविध साहित्यांची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रम आज जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत व सदरील उपक्रमांच्या अंतर्गत विविध बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामे देखील चालू आहेत. यातून अनेक रोजगाराच्या संधी महिलांना उपलब्ध होत आहेत याचे विशेष समाधान वाटते .

या अगोदर अनेक पालकमंत्री झाले, पण नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पहिले असे पालकमंत्री आहेत की ज्यांच्या प्रयत्नांनी डीपीडीसीच्या माध्यमातून पैशाचा वापर महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना रोजगार मिळवण्यासाठी करण्यात आला. विशेष बाब म्हणजे सुमारे 500 गटातील महिलांना दहा लाख रुपयांचे साहित्य वाटप होत आहे. ही वाटचाल अशीच सुरू राहील आणि पुढील पाच वर्षात सुध्दा महिलांना अनेक रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही खासदार विखे यांनी दिली.
तर निळवंडेच्या कालद्रारे पाण्यास विखे पाटील परिवाराचा विरोध असल्याचा वेळोवेळी आरोप झाला मात्र निळवंडेच्या पाण्यापासून लाभार्थी गावांना २०२४ पर्यत पाणी देणार हा दिलेल्या शब्द देखील ज्यांनी आरोप केला त्यांच्याचं मुलाच्या हस्ते पाणी सोडून आम्ही पूर्ण केला . दोन महीने थांबा विखे पाटील परिवारावर झालेल्या आरोपाचे उत्तर देणार ही गर्जना करत कार्यकर्त्यानी आरोपाला भाषणामधून उत्तर न देता डोलाचे ‘ रेशनच्या प्रकरणासह गोर गरिब माणसाच्या कल्याणकारी कामातून दया .

चौकट

रामायणात मथंरा मुळे रामाला वनवास भोगावा लागला अशा अनेक मथंरा आपल्या २६ गाव परिसरात असून ज्यांना घरात , समाज्यात किंमत नाही अशा मथंरा पासून महीलानी सावध रहा या मथंरा आपल्या परिवारासाठी , समाज्याच्या , गोर गरिबांच्या विकासासाठी घातक आहे या मथंरा कोणाच्याचं नसतात त्याचे कामचं आहे रात्रीच्या सुविधा करिता बोट लावा – लावी करणे हेचं होय 

डॉ सुजय विखे पाटील  
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *