आश्वी । झुंजार न्यूज
गण गण गणांत बोते च्या जयघोषात, हजारो भक्तांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील कौठे – मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लि च्या वतीने श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला.
यावेळी श्री गजानन शुगर लि चे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बिरोले , संचालक सौ आश्विनीताई बिरोले , मॅनेजर एम एन पवार , व्यवस्थापक मंडलिक , आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी सात वाजता श्रींच्या पादुका व मूर्तीवर उद्योजक तथा अध्यक्ष रविंद्र बिरोले व आश्विनीताई बिरोले यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात येवून आरती संपन्न झाली. तसेच प्रकटदिनाच्या पूर्व संध्येला गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण, भजन, प्राधिकरणातून पालखी मिरवणूक काढण्यात आली . यावेळी भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या टाकत, महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. हजारो भाविकांनी औक्षण करून दर्शन घेतले.
कार्यक्रम यशस्वी व्यवस्थापक भाऊसाहेब मंडलिक यांच्यासह कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले .
