राज्यस्तरीय स्पर्धेत चतुर्थ क्रमांक
नगर । झुंजार न्यूज
अहमदनगर येथील एन. जे. पाऊलबुद्धे फार्मसी कॉलेज आयोजित डी. फार्मसी एक्झीट परीक्षा या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून सुमारे पंधरा महाविद्यालयाने सहभाग घेतला होता त्यामध्ये लोकनेते अप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी राहुल जिवडे, रितेश भगत, रोनित पाटोळे, प्रीती घाडगे व प्रांजली केकाण यांनी सहभाग घेऊन चतुर्थ क्रमांक पटकावला. त्यांना प्रा. राजेंद्र कळमकर यांनी मार्गदर्शन केले.
त्याबद्दल विद्यार्थांचे शेवगाव पाथर्डीच्या लोकप्रिय आमदार मोनिकताई राजळे, दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री राहुलदादा राजळे, कृष्णा दादा राजळे आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव बी. एम. गोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप देशमुख, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
