पानोडी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विदयालयांच्या वतीने ” महिला दिनानिमित्ताने रमाई , सावित्राबाई , जिजाऊ , अहिल्यादेवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलींच्या विविध स्पर्धा घेवून उत्तेजीत मुलीचा व महिलांचा सन्मान करत ‘ महिलादिन ‘ साजरा करण्यात आला .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशासेविका संघटनेच्या तालुकाध्यक्षा सौ शोभाताई गायकवाड ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेचे प्रोजेक्ट ऑफिसर सौ मंगल कदम , सौ मंगल काळे , सौ वनिता जाधव , श्रीमती एस एस मुन्तोंडे ,  ,श्रीमती वंदना चव्हाण , असमा अशरफी ( सय्यद ) , सौ उषाताई कदम , सौ प्रियंका संदिप कराड , सौ रुपाली जाधव विदयालयाचे मुख्याध्यापक सातपुते , उपमुख्याध्यापक भारती , कांबळे , वाणी , घाडगे , नागरे , आदीसह महिला , विदयार्थी उपस्थित होते .
  

यावेळी रमाबाई,रमाई सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता,अहिल्याबाई ,या महिलांनी आप – आपल्या परिने समाज घडविण्याचे मोलाचे कार्य केले . तर स्त्री ही प्रेम , वात्सल्य , दया – करुणा भावनेतून वागतात मात्र प्रसंगी धैर्यशील बनून कठोर भूमिका वटवत असते २१ व्या शतका पुरुषाबरोबर स्त्री ही सर्व क्षेत्रात आघाडीवर असून अनेक स्त्रीनी विविध क्षेत्रात चमक दाखविल्याचे इतिहास नोंद आहे . स्त्री ही कधी गृहिणी तर कधी अंतराळवीर दिसून आली आहे . समाज्यात घडणारा कर्तृत्ववान व्यक्ती हा  स्त्री च्या मार्ग दर्शनाखालीचं घडलेला दिसत असल्याचे मत अनेकांनी मांडले                                   

यावेळी श्रीमती एस एस मुन्तोंडे यांच्या नेतृत्वाखाली मुलीच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या . यात प्रामुख्याने झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतून लहान गट – श्रद्धा गणेश जाधव ( इ ७ वी ) , मध्यम गट – किर्ती जिजाबापू तरंगे ( इ ८ वी ) , मोठा गट – ऐश्वर्या मोहन खैरे  ( इ ९ वी ) यांनी प्रथम क्रमांक मिळविला .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *