श्रीरामपूर येथील शासकिय विश्रामगृह येथे गुरुवार दि १४ मार्च २०२४ रोजी दुपारी २ वाजता !
आश्वी । झुंजार न्यूज
२०२४ निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून याचं पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपा मित्रपक्ष या नात्याने केद्रींय मंत्री ना. रामदास आठवले यांना निवडणुकीकरिता रिपब्लिकन पक्षाला जागा सोडावी म्हणून गुरुवार दि १४ मार्च २०२४ रोजी दुपारी दोन वाजता श्रीरामपूर येथील शासकिय विश्रामगृह मध्ये तातडीची निर्णायक बैठक रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्याची माहिती संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी दिली .
गेल्या १२ वर्षापासून रिपाई पक्षाची भाजपाशी मैत्री पुर्ण युतीचे संबंध राहिले असून केद्रींय मंत्री रामदास आठवले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नि:स्वार्थी व प्रामाणिकपणे मैत्रीचे संबंध जपले . मात्र पाहिजेल तसा तालुकास्तरीय , जिल्हास्तरीय सत्तेचा वाटा दिला गेला नाही तरी कार्यकर्त्यानी कुठल्याही प्रकारे आवाज उठविला नाही . मात्र आता तसे होणार नाही शिर्डी लोकसभा ही मागसवर्गियाकरिता आरक्षित जागा आहे . एकाचं समाज्याला तीन वेळेस शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधीत्व ( खासदार ) होण्याची संधी मिळाली आता तरी बौद्ध समाज्याला संधी मिळावी म्हणून कार्यकर्त्यचं नव्हे संपुर्ण बौद्ध समाज एकवटला असून गेल्या वर्षभरात आठवले यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेवून मतदारसंघ बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे . केद्रींय भाजपा वरिष्ठांनी या बाबत गांभिर्याने विचार करावा तर महसूल ना राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिकाही फार महत्वाची असल्यानेचं रिपाई वरिष्ठ कार्यकर्ते यांची भेट घेणार असल्याची वाकचौरे यांच्यासह कार्यकर्त्याकडून बोलले जात आहे .
भाजपाने रिपाईकरिता शिर्डी जागा सोडून रामदास आठवले यांना लोकसभेकरिता संधी द्यावी अशी वेळोवेळी कार्यकर्त्यानी मागणी करत असून त्याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथे गुरुवार दि . १४ मार्च २०२४ रोजी दुपारी २ वाजता जिल्हास्तरीय कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आली असून जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , उ. महा अध्यक्ष राजाभाऊ कापसे , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , दलितमित्र पुरस्कार विजेते सुनिल साळवे , जेष्ठ नेते अजय साळवे , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे , युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , जिल्हा विभागीय अध्यक्ष भिमाराज बागुल , रमेश शिरकांडे , अमित काळे , सुभाष त्रिभुवन , अकुश भैलुमे , धनजंय निकाळे , माणिकराव यादव , बापू रणधीर , सागर शिंदे , जेष्ठ नेत्या रमाताई धिवर आदीचे मार्गदर्शन होणार आहे .
तरी होणार्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन आशिष शेळके , सुनिल शिरसाठ , अनिल नन्नवरे , राजेंद्र गवांदे , करण कोळगे , कैलास कासार , योगेश मुन्तोंडे , विजय खरात, सतीश मगर , राजू उबाळे, बाबा राजगुरू , विलास साळवे , सुशील घाईजे , कैलास शेजवळ , नानाभाऊ त्रिभुवन ,रमेश गायकवाड , बाळासाहेब कदम , आबा नन्नवरे , अमोल राखपसरे मधुकर सोनवणे , विजय अडागंळे , सावळेराम गायकवाड , विजय पवार , राजू मगर , अॅड सुदाम डुबे , गोविंद दिवे , प्रविण लोखंडे , राजाभाऊ निकाळे , दिपक शिंदे , सोमनाथ लोहकरे , विकी कापसे , आयुबभाई पठाण , छोटू शेख , शहनाज बेगमपुरे , बाबासाहेब पंडीत , सिमाताई बोरुडे , स्नेहलताई सांगळे , आरती बेडेकर , रुपाली सोनवणे , वैशाली सोनवणे , आश्विनीताई कसबे आदींनी केले आहे .
Post Views: 915
