नगर । झुंजार न्यूज

 राज्य शासनाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते साळवे व सौ. रत्नमाला साळवे यांनी पुरस्कार स्विकारला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नरिमन पॉर्इंट मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) जमशेदजी बाबा नाट्यगृहात झालेल्या या शासनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोडिया, आमदार अग्रवाल, केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे, समाज कल्याणचे वरिष्ठ लिपीक मधुकर महानोर आदी उपस्थित होते.

सुनील साळवे यांचे रिपाईच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्गीय समाजातील विविध प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी ते योगदान देत असून ते जामखेड तालुक्यातील नान्नज येथील कार्यकर्ते असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी व तत्वाशी समरस होवून तळागाळातील लोकांकरिता धडपडणारा एक आक्रमक व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहे दलित पँथरपासून ते केद्रींय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी एकनिष्ठेने काम करत आहे अहमदनगरचा दक्षिण भाग म्हणजे एक दुष्काळी पट्टा असल्याने समाज्यात काम करताना फार अडचणी येतात त्यातूनही मार्ग काढत सुनिल साळवे यांनी बहुजन समाज्यात आपली एक नाविन्यपुर्ण ओळख निर्माण केली .
दलित पँथर ते रिपब्लिकन चळवळ प्रवास करताना सामान्य कार्यक्रता म्हणून अनेक वर्ष काम केले . त्यानंतर जामखेड तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी तेव्हाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी दिली . त्या संधीचे सोनं करताना सुनिल साळवे यांनी सातत्याने आपला चढता आलेख ठेवला दलित समाज्यासह बहुजन समाज्यावरील अन्याय अत्याचाराविरोधात सातत्याने आंदोलन , मोर्चा , रस्ता रोको , उषोषण करत लोकांना न्याय मिळवून दिला तसेच राज्यस्तरिय ” जातीय सलोखा परिषद ” ” दलित हक्क परिषद घेवून सामाजिक ऐक्य लढा उभा केला . तसेच सामाजिक कार्यात काम करताना राजकिय , सहकार , शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात आपला दबाव गट निर्माण केला . हसमुख व प्रेमळ स्वभावातून मित्र परिवार मोठ्या प्रमाणात जोडला गेला . मात्र समाज्यावर अन्याय झाला असता कधी ही क्रॉम्प्रमाईज भूमिका घेतली नाही सत्यला सत्यताचं पाळली प्रसंगी मंत्री , खासदार , आमदार व आधिकाऱ्यांना धारेवर धरले . 

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले , पत्रकार राजेश गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तीं त्यांचे अभिनंदन करत आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed