कनकापूर येथे सप्ताहाची काल्याच्या कीर्तनेने सांगता

 

पिंपरणे । झुंजार न्यूज

 

परमार्थ हा निष्ठेने करा एक दिवस परमेश्वर भेटल्या शिवाय राहणार नाही परमार्थ हा निष्ठवंताचा असून निसटून घेणाऱ्यांचा नाही भगवंतासाठी रात्रंदिवस भगवंताचा अभ्यास करावा लागतो मनात शुद्ध भाव असावा लागतो धर्म रक्षणाचे काम भगवंताने केले असल्याचे प्रतिपादन ह भ प महंत रामगिरी महाराज यांनी केले

 

 

सद्‌गुरु गंगागिरीजी महाराज व ब्रम्हलीन सद्‌गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाआशिवार्दाने व महंत रामगिरीजी महाराज, गोदावरी धाम मठाधिपती, सरला बेट यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती मुर्ती, विठ्ठल रुख्मिणी माता, खोकल्याई देवी, महादेव पिंड, दक्षिणमुखी पवनपुत्र हनुमान मुर्ती, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज पादुका व दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा सातवा वर्धापन दिन सोहळ्या निमिताने पंचदिनी हरीनाम हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संगमनेर तालुक्यातीतील श्री क्षेत्र कनकापुर, संपन्न झाला

 

या सप्ताहाकाळात रोज सकाळी काकडा भजन सकाळी ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हरिपाठ रात्री पाच दिवस विविध कीर्तनकारांची कीर्तन संपन्न झाली कीर्तनानंतर रोज भाविकांसाठी महाप्रसाद कार्यक्रम होत असे सोमवार दि १८ रोजी सकाळी १२ वा ह.भ.प. महंत रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला

 

सप्ताह काळात गावातील तरुणांनी व जेष्ठ व्यक्तींनी परिश्रम घेतले

 

यावेळी समस्त ग्रामस्थ कनकापुर व पंचक्रोशितील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed