आश्वी । झुंजार न्यूज 

राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदॠषीजी महाराज जैंन धर्म स्थानक आश्वी बुद्रुक चा लोकार्पण सोहळ्यात  नारी सेवा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यास जिल्ह्य़ातून आलेला जैंन समाज भारावून गेला.
जैंन साधु, साध्वी लोक कल्याणाचा हेतुने जगाला भगवान महावीरांची अहिंसेचे व  जगा आणी जगु द्या ची शिकवण पायी सर्वत्र फिरुन करत असतात या साधु साध्वी चे आहारा बाबतीत कडक नियम असतात या नियमांचे आचरण करुन त्यांच्या आहाराचे नियोजन करणे त्यांची सेवा करण्याचे कार्य करणार्या महिलांचा सन्मान व्हावा या हेतुने जैंन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी यांच्या संकल्पनेतून नारी सेवा सन्मान सोहळ्याचे आयोजन 
राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदॠषीजी महाराज जैंन धर्म स्थानक आश्वीचा लोकार्पण सोहळ्यात  करण्यात आले 
या प्रसंगी राष्ट्रसंत प पु कमलेश मुनीजी महाराज कमल ठाणा ४  जिनशासन गौरव, पु श्री सुनंदाजी महाराज आदी ठाणा ५,सेवाभावी पु श्री किर्तीसुधाजी महाराज,प पु श्री गुरुस्मृर्तीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तर दानवीर भामाशाहा रमणलाल  कपुरचंद लुंकड पुना यांच्या शुभहस्ते अॅड शाळीग्राम होडगर, नवीन मुनोत, प्रकाश भंडारी, अॅ ड. अशोक बोरा, झुंबरलालजी बोरा,  नंदकुमार भटवेरा,प्रफुल्ल बोगावत,सुमतीलाल भंडारी, मंगला बाई भंडारी , जयश्रीजी चंगेडीया,लताबाई गुंदेचा,चंचलबाई गांधी,उषाबाई संकलेचा, सतिष लोढा ,बाबुशेठ बोरा, मनसुख गुगळे,सुवालालजी लुंकड, कमलेश भंडारी ,सुभाष सावज, डाॅ अशोक लोढा, रमेश गुंदेचा, अनिल पिपाडा,संजय कटारीया,अनिल लोढा, शिरीष दर्डा, दिलीप पारख,वसंत फिरोदिया,राजकुमार गांधी, विनोद गांधी,  प्रमोद गांधी, राजेंद्र गांधी,राजेंद्र  पिपाडा,मनोज गुंदेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाला .
या वेळी दानवीर भामाशाहा रमणलाल लुंकड, अॅड अशोक बोरा, यांनी भरीव निधी जाहीर केला.
नारी सेवा सन्मान सोहळ्यासाठी  अहमदनगर, पुणे , नाशिक, औरंगाबाद जिल्ह्य़ातून आलेल्या हजारो जैंन बांधवांनी कौतुक केले. या वेळी गौतम प्रसादी चे आयोजन निर्मला रसिकलाल रातडीया यांच्याकडुन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमतीलाल गांधी यांनी केले .सूत्रसंचालन रुपा गोडगे तर आभार सुशील भंडारी यांनी व्यक्त केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed