संगमनेर । झुंजार न्यूज
जागतिक महिला दिनानिमित्त युवा नेतृत्व सौ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फौंडेशन तर्फे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे दि.८ मार्च २०२४ ते ११ मार्च २०२४ या दिवशी महिला क्रिकेट व रस्सीखेच या स्पर्धांचे शालेय, महाविद्यालयीन व खुला अशा गटामध्ये आयोजन करण्यात आले होते. सदरच्या शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींनी सांघिक खेळ करताने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी सामजिक कार्यकर्त्या सौ.कांचनताई थोरात एकविरा फौंडेशन च्या अध्यक्षा सौ. डॉ जयश्रीताई थोरात व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , माजी आमदार डॉ सुधीर तांबे , सौ दुर्गाताई तांबे , संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख , संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल शिंदे , संस्थेचे मैनेजर धुमाळ, डायरेक्टर अकॅडमिक गुरव सर व स्कूल च्या प्राचार्या सौ.जसविंदर सेठी मैडम यांनी विजयी विद्यार्थिनिंचे अभिनंदन केले
