झरेकाठी । झुंजार न्यूज

 

लोणी येथे शिक्षण घेत असलेले ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या ऋतिका अनाप,अनुजा लवांडे,समृदधी थोरात,शिवानी कडु , ईश्वरी आवाशंक ह्या विद्यार्थीनी विविध प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.

 

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय लोणी येथे विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. संचालिका कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय व कृषी महाविद्यालय लोणीच्या प्राचार्या डॉ. शुभांगी साळोखे, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम अनाप, डॉ. दिपाली तांबे व प्रा. विशाखा देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्याधी योग्य व अचूक प्रमाणे आखणी कशी करावी याचे प्रशिक्षण देले . यावेळी सावित्रीबाई निकम,मयूरी कोठाळे,वर्षा बर्डे ,सुरेश वाणी आदी उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed