बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी–सौरभ मिरीकर

संगमनेर । झुंजार न्यूज

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांनी जगावर वर्चस्व निर्माण केले आहे सध्या अर्थव्यवस्था मंदीत असली तरी मंदीतही नोकरीच्या संधी निर्माण होत असून बँकिंग क्षेत्रात युवकांना नोकरीची मोठी संधी निर्माण होत असल्याचे प्रतिपादन कोटक महिंद्रा चे मा. उपाध्यक्ष सौरभ मिरीकर यांनी केले आहे

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या विज्ञान महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील विविध संधी या विषयावर ते बोलत होती यावेळी समवेत ॲड .कुलदीप पाटील , प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब वाघ, उपप्राचार्य डॉ. विलास कोल्हे, आय.क्यू.ए.सी, समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट, प्रा. गणेश थोरात,प्रा.महेंद्र ठाकरे, प्रा.नवनाथ नागरे, प्रा.महेश हजारे, प्रा.अनिकेत लंगोटे, प्रा.रोहिणी गुंजाळ आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत महाविद्यालयातील 315 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला

यावेळी बोलताना मिरीकर म्हणाले की, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अगदी स्वतःपासून कुटुंब आणि समाजाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंग हा विषय महत्त्वाचा झाला आहे. बँकिंग मध्ये नवीन ऑनलाईन ची प्रणाली आली आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये पैशांची देवाण-घेवाण आपण करू शकतो.

अवघड आहे मात्र संधी मोठ्या प्रमाणात आहे. आयटी क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रमाणे बँकिंग क्षेत्रातील तज्ञांनाही परदेशात मोठी मागणी आहे. नोकरीची हमखास हमी देणारे हे क्षेत्र असून विद्यार्थ्यांनी यामध्ये करिअर करण्यासाठी विविध कोर्सेस निवडले पाहिजे.

थोरात महाविद्यालयाने सातत्याने विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न केले असल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयातून थेट नोकरीच्या संधी मिळाले आहेत ग्रामीण पातळीवरील हे महाविद्यालय अत्यंत चांगले काम करत असल्याचेही ते म्हणाले

तर कुलदीप पाटील म्हणाले की अनेकांना नोकरी मिळत नाही परंतु अनेक चांगल्या नोकऱ्यांच्या ठिकाणी माणसे मिळत नाही ही शब्द आहे म्हणून प्रत्येकाजवळ चांगले कौशल्य असेल तर त्याला चांगली नोकरी मिळते आणि बँकिंग क्षेत्रामध्ये सध्या चांगल्या माणसांची गरज असल्याचे ते म्हणाले

तर प्राचार्य डॉ पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयात काम होत असून नोकरीच्या अनेक सुविधा विद्यार्थ्यांना थेट उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र प्लेसमेंट विभाग सुरू करण्यात आला असून त्याचा अनेकांना फायदा झाला असल्याचेही ते म्हणाले

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तुळशीराम जाधव यांनी केले तर समन्वयक डॉ लक्ष्मण घायवट यांनी आभार मानले
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *