जोर्वे गावात जाहीर निषेध करण्यात आला
जोर्वे
नारेबाजी कोणी केली? असे म्हणत नांदुर शिंगोटे येथून क्रिकेट खेळुन घराकडे जाणाऱ्या आठ तरुणांना जोर्वे नाक्यावर आडवून मारहाण केली. ही घटना आज बुधवार दि. २१ मार्च २०२४ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली. यात आठ तरुणांना बॅटने मारहाण करुन शिविगाळ दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी साई महेश जाधव याने दिलेल्या फिर्यादीनुसार एम.एच १७ सीपी ६०२८ या गाडी चालकासह अन्य सात ते आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे, पुन्हा एकदा जोर्वे नाका चर्चेत आला असून हे ठिकाणी मारामाऱ्यांची आणि दंग्याचे हॉट्स्पॉट बनले आहे.
अशी. की, जोर्वे गावातील साई महेश घुले क्रिश संतोष पगार, कृष्णा सतिष क्षिरसागर, अदित्य पोपट घुले, दिपक सोपान घुले, साईनाथ राजेंद्र गायकवाड, राहुल राजू पगारे, गणेश गोविंद जोर्वेकर हे आठजण दि. २० मार्च २०२४ रोजी नांदुर शिंगोटे येथे नाईट क्रिकेट मॅचेस खेळण्यासाठी गेले होते. मॅच संपल्यानंतर हे सर्व तरुण रात्री १ वाजता आपल्या जोर्वे गावी मोटरसायकलवरून घराकडे जात असताना रात्री 1 ते 2 या दरम्यान जोर्वे नाक्यावर
जात असताना दोघांनी MH17सी पी 6028 नंबरची गाडी आठ जणांना गाडी आडवी लावून नाराबाजी कोणी केली? असे म्हणत त्याने शिविगाळ दमदाटी करण्यास सुरूवात केली. तर, गाडीहून उतरुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. यांच्या जवळची बॅट हिसकावून घेत त्यांनाच मारण्यात आले त्यावेळी तेथे एकच आरडाओरड झाला आणि त्या क्षणी घटनास्थळी आणखी 30/40 जण आले . त्यांनी देखील धक्काबुक्की करत शिविगाळ मारहाण करण्यास सुरूवात केली. नंतर लोकांनी सोडवासोडव करुन या आठ जणांना पोलीस ठाण्यापर्यंत नेवून सोडले. त्यानंतर यांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची दखल घेत जोर्वे गावातील ग्रामस्थांनी गुरुवारी दि 21 रोजी सकाळी गावातील मुख्य चौकात सभा घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला

यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व परिसरातील गावांमधील तरुण, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जोर्वे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता काही तरुणांनी टायर जाळून घोषणाबाजी केली पोलीस निरीक्षक देविदास ढोमणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व धार्मिक स्थळांवर पोलिसांचा पहारा होता तर गावातही मोठा पोलीस फौज फाटा तैनात केला होता

चौकट
दिल्ली नाका व जोर्वेनका या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे तसेच शहरातील संवेदनशील भागात सीसीटीव्ही बसवावे तसेच जोर्वे नाका या ठिकाणी पोलीस चौकी तयार केली असून त्यामध्ये पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली
