जनरल सेक्रेटरीपदी अॅड. टोकेकर तर सहसेकेटरीपदी सौ गायकवाड 

शिर्डी । झुंजार न्यूज

आशा गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कॉ. सुवर्णा थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष म्हणून कॉ. सुरेश पानसरे तर जनरल सेक्रेटरीपदी अॅड. कॉ. सुधीर टोकेकर आणि मार्गदर्शक म्हणून कॉ. सुभाष लांडे यांची निवड करण्यात आली आहे.
आशा गटप्रवर्तक संघटनेची जिल्हा वार्षीक बैठक शिर्डी येथे नुकतीच झाली. या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्य. या कार्यकारीणीत जिल्हा उपाध्यक्षपदी सुनिता धामने, सुचित्रा ढोकणे व उषा अडांगळे यांची नियुक्ती करण्यात आली. सहसेक्रेटरी म्हणुन शोभा गायकवाड, कविता गिरे, स्मिता ठोंबरे, स्वाती भगणे, कार्यकारी सदस्य म्हणून सुप्रिया जाधव, शिंगाने मंगल, शारदा काळे, मनिषा डांभे, नाजीया पठाण, स्वाती इंगळे व सोनाली भवार यांची निवड करण्यात आली आहे.
राहाता तालुकाध्यक्ष कॉ. सविता धापटकर यांनी बैठकीचे नियोजन केले. त्यांनी आशांना झालेल्या पाच हजार रुपये वाढीचे स्वागत केले; परंतु गट प्रवर्तकांना वाढ मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही आनंदोत्सवात सहभागी होणार नाही, असे सांगितले.
पानसरे यांनी आचारसंहिता जूनमध्ये संपल्यानंतर गट प्रवर्तकांच्या दहा हजार रुपये वाढीसाठी तिव्र लढा उभारला जाईल, असे सांगीतले. सुवर्णा थोरात यांनी गट प्रवर्तकांनी मुंबई आझाद मैदान येथे झालेले आंदोलन व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची माहीती दिली.
कार्यक्रमास व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन संजय शिंगवी यांनी मनोगत व्यक्त केले. आयटकच्या राज्य काउन्सील सदस्य जयश्री गुरव, शितल विखे, आशा देशमुख, श्रीमती पंढुरे, वंदना थोरात, सुपरवायझर श्रीमती बाचकर, श्रीमती खेमनर, चंदा शिंदे, श्रीमती साबळे उपस्थित होत्या. सविता घापटकर यांनी आभार मानले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed