श्रीरामपूर । झुंजार न्यूज

 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल सौ. पुनमताई करण नवले यांना राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी पत्रकार संघाचे वतीने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माऊली वृद्धाश्रम अध्यक्ष सुभाषराव वाघुंडे हे होते. संपादक करण नवले, वृत्त संपादक अशोकराव गाडेकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, देविदास देसाई अकोले तालुकाध्यक्ष श्री अशोकराव उगले, संभाजीनगर संपर्क प्रमुख कुंडलीक वाळेकर ज्येष्ठ शिक्षिका सौ उषाताई गवळी, सौ कल्पनाताई वाघुंडे हभप राजवळ नाना आदी उपस्थित होते.

 

या पुरस्कारात सन्मानपत्र, महालक्ष्मी चांदीची मूर्ती, पैठणी, शाल, घड्याळ, डायरी व कॅलेंडर देण्यात आले. याप्रसंगी पत्रकार बांधव यांना डायरी, कॅलेंडर ,घडयाळ , मिठाई अशा विविध वस्तूचे वाटप करण्यात आले

याप्रसंगी दै. समर्थ गावकरी चे संपादक डॉ.विश्वासराव आरोटे बोलताना म्हणाले की, पत्रकार हा सदैव कामात असतो त्याचे घर सांभाळणारी पत्नी असते म्हणून तिच्यातील शक्तीचा गौरव व्हावा म्हणून पत्रकार संघाचे वतीने नारी शक्ती सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या हिताचे निर्णय घेऊन सण उत्सव कालावधीमध्ये मदत कार्य सुरू आहे.

दै. राष्ट्र सहयाद्रीचे संपादक करण नवले यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने पत्रकार बांधव परिवारातील महिलांचा सन्मान हि कौतुकाची बाब असून संघटनेचे कार्य चांगल्या प्रकारे राज्यभरात सुरू असल्याचे प्रतिपादन केले.

सौ पुनमताई नवले यांनी पुरस्कारा बद्दल आभार व्यक्त करत पत्रकारिता हि वारसा हक्काने आलेली असून माझे माहेर कडील परिवारातील अनेक सदस्य पत्रकारिता क्षेत्रात होते.

कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झुरंगे, राजेंद्र देसाई, दिलीप दायमा, सल्लाउद्दीन शेख, अनिल वाघुंबरे, भानुदास बेरड, अमोल कदम, सतिष म्हसे, शुभम नामेकर, दिनेश जेजुरकर, दत्तात्रेय खिलारी, दिपक देशपांडे, कचरू निकम उपस्थित होते.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed