आश्‍वी | झुंजार न्यूज

 

भारतीय संस्कृतीत दानाला त्यागाचे स्वरूप दिले जाते. यांचा अनुभव नुकताच आश्‍वी खुर्द (ता. संगमनेर) येथील सौ. कमलबाई भागवत गायकवाड तथा भडकवाड ( वय – ६३) यांनी मृत्यू पश्चात नेत्रदान करुन कृतीतून दाखवून दिला आहे.

 

सौ. कमलबाई गायकवाड या मागील अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या धार्मिक वृत्तीच्या असल्याने दान – धर्म करण्याची त्यांना आवड होती. त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला मरणोपरांत नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. नुकतेच त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार मुलगा सचिन गायकवाड यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाला याबाबत माहिती दिली. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारक यांनी घटनास्थळी येऊन त्यांची नेत्रदानाची इच्छा पूर्ण केली.

 

दरम्यान संध्याकाळी उशीरा त्यांच्या पार्थीव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पती भागवत गायकवाड, मुले ह.भ.प. सचिन महाराज गायकवाड विलास गायकवाड, विकास गायकवाड, तीन सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed