संगमनेर । झुंजार न्यूज

उन्हाची चाहूल लागताच आरोग्यदायी असलेला मातीचा माठ बाजारपेठेत दाखल झाला आहे. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने उन्हाची चाहुल लवकरच लागल्याने माठाची चांगली विक्री होण्यास सुरूवात झाली आहे. तसेच संगमनेरी  रंगबिरंगी असणारे मातीचे माठ नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.या  माठांना ग्राहकांची पसंती मिळत आहे 
सध्या उन्हाची तीव्रता  वाढू लागल्यामुळे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणाऱ्या  मातीच्या माठाला नागरिकांमधून मोठ्या संख्येने मागणी होत असून तसेच या माठाला लिंबू शरबत गाडी, तसेच ज्यूस गाडी, घरगुती अशी मोठ्या संख्येने मागणी आहे. सध्या बाजारामध्ये नव नवीन मातीचे माठ दाखल झाले असून यावर तुटीसह नक्षीही बसवण्यात आली आहे. 
बाजारात आता 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत माठ बाजारपेठेत उपलब्ध आहेत. उन्हाच्या तीव्रतेत  वाढ होत असल्याने माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कमी किंमतीमध्ये फ्रीज प्रमाणे उन्हाळ्यात नैसर्गिक पाण्यानेतहान भागवली जाते म्हणून आज फ्रीजच्या जमान्यातही मातीच्या माठाला वेगळेच महत्व आहे. वेगवेगळे नक्षीकाम आणि रंगबेरंगी माठाने बाजारपेठा भरलेल्या दिसत आहेत. या आकर्षीत नक्षीकाम केल्याने माठ आवडू लागले आहेत. माठामध्ये देखील बदल करुन त्यास तोटी, झाकण हे वेगळे बनवून ग्राहकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. 100 ते 500 रुपये पर्यंत सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल असे माठ बाजारात उपलब्ध आहेत. यंदा सर्वात कमी किमतीत हा माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. 
चौकट
मातीच्या माठातील पाणी आरोग्यदायी 
माठातील पाण्याची चवच न्यारी असते. उन्हाळ्यात थंड पाण्याची मागणी असते. पण फ्रीजमधल्या पाण्यात ती चव नाही, ती मातीच्या माठातील पाण्याला आहे गेल्या काही दिवसांपासून दाखल झालेल्या मातीच्या माठाला अधिकची मागणी आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांपासूनच उन्हाची तीव्रता ही वाढली आहे. त्यामुळे कमी किमतीमध्ये उपलब्ध असलेल्या माठाला अधिकचे महत्व आले आहे. मागणी अशीच राहिली, तर भविष्यात दर वाढतील असेही संकेत विक्रेत्यांनी दिले आहेत.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed