आश्वी । झुंजार न्यूज  

 

 

संगमनेर तालुक्यातील पुर्व भागात बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने संध्याकाळी हजेरी लावल्याने शिबलापूर येथील 60 x 30 असणाऱ्या पक्का घरांच्या भिंती पडून घरावरील पत्रासंच उडून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले यासह अनेक गावांमध्ये शेतीमालाचे , पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या नुकसानग्रस्तांना मदत व्हावी अशी मागणी होत आहे .

 

शिबलापूर येथील एकनाथ सखाराम नागरे यांच्या 60 x 30 घराचे पत्रे उडाल्यामुळे त्यांचा विविध धान्य , मशनरीसह लाखो रुपये नुकसान होवून संसार उघड्यावर आला आहे. आश्वी – शिबलापूर  रस्त्यालगत वृक्ष व विजेचे पोल वाकले असून शेतकऱ्यांना अंधारात रात्र काढावी लागली आहे.

 

 

त्यातच पावसामुळे संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तलाठींनी घराचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरे यांनी केली आहे. वादळामुळे पुर्व भागातील अनेक गावांमध्ये  वीज वितरण कंपनीचे पोल वाकले आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. 

 

 

चौकट 

 

बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी घराचे , शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसान ग्रस्तांना त्वरीत शासनाने मदत करावी तर . एकनाथ नागरे यांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणात आहे सुदैव कुठल्या प्रकारे मानवी हानी झाली नाही .

 

प्रमोंद बोंद्रे ( संरपच , शिबलापूर )

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed