शिर्डी । झुंजार न्यूज

शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना तर शिंदे गटाकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा वाकचौरे विरुद्ध लोखंडे आमने सामने येणार आहेत. मात्र, काँग्रेसकडून इच्छुक असणाऱ्या उत्कर्षा रूपवते या बंडखोरी करण्याच्या तयारीत असून उत्कर्षा रूपवते नुकतीचं प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने  ‘ रुपवतेच्या ‘ रुपाने वंचित पॉवरफुल बनून तिरंगी लढत होण्याची शक्यता ? लोखंडे – वाकचौरे यांना रुपवतेच्या रुपाने तिसरा पर्याय रामदास आठवले यांना भाजपाने उमेदवारी न दिल्याने नाराज लोकांना मिळाला असल्याची चर्चा होवू लागली आहे 

2014 मध्ये देखील या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत झाली होती. त्यावेळी भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये होते. 2014 मध्ये लोखंडे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर होऊनही खासदार होण्याचा मान मिळवत तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. आता भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. शिवाय गेल्या 10 वर्षात विद्यमान खासदार कोणतही काम करू शकले नसून जनता माझ्या पाठीशी असल्याचा दावाच त्यांनी केलाय. तर गद्दार कोण हे जनता ठरवेल असा इशारा लोखंडे यांना दिलाय.

शिवसेना नंतर काँग्रेस त्यानंतर पुन्हा भाजप आणि अपक्ष असा प्रवास करत मशाल हाथी घेतलेल्या उमेदवाराने गद्दार कोण हे सांगू नये, असा टोला लोखंडे यांनी वाकचौरे यांना लगावलाय. तर मी 2014 पासून धनुष्यबाण चिन्ह घेऊन जनतेत गेलोय. आजही ते सोडलेलं नाही, असं वक्तव्य करत शिंदे सोबत जाण्याच्या निर्णयाचं लोखंडे यांनी समर्थन केलंय.

यावेळी काँग्रेसने जागा सोडल्याने इच्छुक असणाऱ्या उत्कर्षा रूपवते मात्र नाराज असून बंडखोरी करण्याची शक्यता आहे. माझ्या कार्यकर्त्यांशी व समाजाशी बोलून दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं वक्तव्य करताना महाविकास आघाडीला विजय मिळवायचा असेल तर निर्णयाचा फेरविचार करा, असा इशाराच रुपवते यांनी दिलाय.
4 टप्प्यात पार पडणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील या आजी माजी महसूलमंत्र्यांचे मतदारसंघ आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली असून गेल्या अनेक दिवसापासून केद्रींय मंत्री रामदास आठवले व कार्यकर्त्यांनी शिर्डीतून आठवले यांच्याकरिता उमेदवारी मागितली मात्र वरिष्ठासह , जिल्ह्यातील नेत्यांनी या मागणीकडेचं कानाडोळा केल्याने संपुर्ण जिल्ह्यातील आठवले समर्थक नाराज झाल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे झालेल्या नाराजी मुळे संध्याचे चित्रचं वेगळे दिसत असल्याने लोकांच परिवर्तन होताना दिसत आहे तर
कै.प्रेमानंद रुपवते यांनी हा मतदार संघ बांधण्याचा प्रयत्न केला . कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहत दल बदलपणा केला नाही 2014 ला शिवसेनेकडून शिर्डीकरिता तिकिट मिळत असताना गद्दारी नको म्हणून एकनिष्ठाता पाळली तेव्हा शिवसेनेत गेले असते तर आज चित्र निश्चित वेगळे असते तेव्हा कॉग्रेस वरिष्ठांनी ही याबाबत दखल घ्यायला हवी आता गद्दारी नव्हे सोयीनुसार राजकारणाकरिता गट – तट निर्माण झाले असून उत्कर्षा रुपवते यांनी मागे न राहता आता लढाई लढले पाहिजेल अशी जनतेची भावना आहे .
वाकचौरे हे पाच वर्ष खासदार असताना गावोगावी  कार्यकर्ते जोडले तर खासदारकीच्या काळात ग्रामीण भागात सभामंडप बांधले. शिवाय, आपला माणूस आपल्यासाठी हे ब्रीद वाक्य जनतेत पोहचविण्यात त्यांना यश आलंय. उध्दव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा फायदा भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. असून आता पर्यंत शहर , गावो गावी जावून विविध कार्यक्रमात सहभाग नोंदविल्याने आर्धा प्रचार झाल्याचे दिसत आहे . मात्र आजवर भाऊसाहेब वाकचौरे यांनी अनेकदा पदासाठी वारंवार पक्ष बदलले आहेत. शिवसेना, काँग्रेस, भाजप, अपक्ष व पुन्हा शिवसेना ठाकरे गट असा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीमुळे मतांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सदाशिव लोखडे हे गेल्या 10 वर्षापासून खासदार आहेत. निळवंडे धरणाच्या कालवे  निर्मितीपासून पाणी येईपर्यंत केलेला संघर्ष जनतेपर्यंत मांडता येईल. प्रत्येक मतदार संघात केलेली विकास कामे आहेत. महायुतीचे सर्वांत जास्त आमदार असल्यामुळे त्याचा फायदा सदाशिव लोखंडे यांना होऊ शकतो. अजित पवारांच्या महायुतीमध्ये येण्याने ताकद वाढली आहे. 

मात्र सदाशिव लोखंडे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत. मात्र, जनतेत येत नसल्याच्या वाढलेल्या तक्रारी त्यांची डोकेदुखी ठरु शकतात. मतदारसंघात कमी व  मुंबईत जास्त वास्तव्य करत असल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा झाला आहे. 2 वेळा संधी देऊन खासदार करणाऱ्या उध्दव ठाकरे यांची सोडलेली साथ अंगलटही येऊ शकते”
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed