राजकीय पक्ष, गट-तट, धर्मभेद बाजूला ठेवून, आपल्याकडे काम घेऊन आलेला कार्यकर्ता हा आपल्या जिह्यातील , तालुक्यातील , चळवळीतील आहे. असे समजून सतत काम करीत असणाऱ्या व कार्यकर्त्यांना आपलेसे करणाऱ्या सुरेंद्र भाऊ म्हणून अल्पावधीतच राहुरी तालुक्यासह जिल्हयात एक नाव्यानं पुर्ण राजकारणात गरुडभरारी घेतली आहे.
केद्रींय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हयातील उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवकच्या माध्यमातून भाऊनी सामाजिक , चळवळीची बांधिलकी जोपासली आहे. कुठल्याही प्रकारे अपेक्षा न बाळगता, रिपब्लिकन पक्षासह इतर सर्व पक्षांतील सर्वसामान्य कार्यकर्ता व युवक हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी कार्यकर्त्यांना व युवकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर , अकोले , कोपरगांव , राहाता , श्रीरामपूर , नेवासा , राहुरी या तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील गावां – गावात कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळलेली दिसत आहे.
जिल्हयातील दीनदलित, गोरगरीब जनतेला ज्यादा फायदा व्हावा व त्यांचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक जीवनमान सुधारावे यासाठी त्यांनी मागील पंचवीस वर्षांपासून सतत प्रयत्न केले आहेत. त्याचा परिणाम आता तालुका – तालुक्यात दिसून येत आहे .रिपब्लिकन चळवळीच त्या माध्यमातून युवकांचे मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण केल आहे . केद्रींयमंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून व पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्यावतीने विविध आंदोलने , मोर्चा , उपोषण करुन दिन दलित , आदीवाशी , गोर गरिब , शेतकरी , अत्याचाऱ्यांना न्याय मिळत दिला देण्या करिता कार्य तत्पर दिसत आहे .
सुरेंद्र थोरात यांना बाल वयातचं चळवळीचे बाळकडू मिळाले होते पँथर चळवळीमधील वडीलांचे मोठे योगदान होते नि स्वार्थीपणे पँथर वाढविण्याकरिता त्यांच्या वडीलांनी काम केलेले त्यांनी बघितले पुढे सुरेंद्र यांनी लोकांशी युवकांशी , मनमिळाऊ पणाने संबंध ठेवत आक्रमक व प्रखरतेने काम करत असल्याने युवकांसह लोकांचा ‘ महिलांचा गराडा होवू लागला . पुढे गावांतचं लोकांनी सुरेंद्र च्या कामाची झलक बघितल्याने सुरेंद्रला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली मागे वळून न बघता सामाजिक स्त्रोत डोळ्यासमोर ठेवून वृध्द महिला असो या पुरुष , बेरोजगार तरुण , शाळकरी विदयार्थी यांच्या समास्या तातडीने सोडविणे हे धोरण ठेवले .
पँथर चळवळ ते रिपब्लिकन पक्षाचे कार्य जिल्हयात दमदार होते . २००९ मध्ये शिर्डीतून रामदास आठवले यांचा पराभव झाला हे कोणामुळे झाले हा इतिहास जमा झाला मात्र पक्षाला मळगळ आली . अनेक जिल्हाध्यक्ष झाले पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न झाला मात्र युवक वर्ग आकर्षित होवू शकला नाही . मागील दहा वर्षापासून सुरेंद्र थोरात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले त्यांनी तालुका – तालुक्यात युवकांना आकर्षित केले पक्षाला युवकाची झरारी मिळाली ती केवळ सुरेंद्र थोरात यांच्या मुळे युवकांना सामाजिक , आर्थिक , राजकिय धडे देत आक्रमक बनविले त्यामुळेचं त्यांचे नाव भाऊ म्हणून सतत चर्चेत येऊ लागले आहे.
पदांची व आर्थिक लाभाची कोणतीही अपेक्षा न बाळगता सतत काम करण्याच्या या त्यांच्या पद्धतीमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्ते व रिपाई पक्षातील नेतेमंडळी जिल्ह्यातील प्रभावी नेतृत्व व युवक नेते म्हणून त्यांच्याकडे पाहू लागली आहेत.
केद्रींय मंत्री रामदास आठवले यांच्या सामाजिक व राजकिय विचारावर थोरात यांनी कार्य सुरू रिपाई चळवळीला अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न केला त्यामुळेचं राजकीय पटलावर भाऊचे नेतृत्व कणखर असून आपल्या कामातून युवकाच्या व जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कोणत्याही दबावाला व आमिषाला बळी न पडणारे नेतृत्व असल्याने सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते व तरुणांच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसत आहेत. यापुढील काळातही त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, हीच त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा..!”