श्रीरामपूर । झुंजार न्यूज

गेल्या अनेक दिवसापासून आठवले यांच्यासह कार्यकर्त्यानी शिर्डीची जागा आठवले यांना मिळावी म्हणून मागणी केली मात्र महायुतीकडून उमेदवारी मिळू नये म्हणून कोणत्या शुक्राचार्यानी प्रयत्न केले यांचा शोध घेतला जाणार असून शिर्डीची जागेचा बाबत पालकमंत्र्यासह भाजप नेत्यांनी फेरविचार करावा अन्यथा ही निवडणुक जड जाईल असा इशारा रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी पत्रकार परिषदेतून दिला .
श्रीरामपूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विजय वाकचौरे बोलत होते यावेळी राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , उत्तर महा सचिव राजाभाऊ कापसे , दिपकराव गायकवाड , भिमा बागुल , सुभाष त्रिभूवन , रमेश शिरकांडे , धनजंय निकाळे रावसाहेब बनसोडे , अनिल नन्नवरे , राजेंद्र गवांदे , रमाबाई धिवर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते .
विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की , लोकसभेच्या निवडणुकाकरिता शिर्डी , सोलापूर जागा मिळावी म्हणून आम्ही ठाम आहोत . महायुतीच्या नेत्यानी यांचा विचार करावा त्याकरिता नगर जिल्ह्यात तालुक्या – तालुक्यात मेळाव्या घेवून प्रकर्षानी मागणी करणार तर शिर्डी जोपर्यत जागा सुटणार नाही तो पर्यत आम्ही कोणाची ही प्रचार करणार नसून ही पक्षाची , कार्यकर्त्याची अस्तित्वाची लढाई असल्याने  शिर्डीतून भिमा बागुल , दिपक गायकवाड हे तर दक्षिणेतून विजयराव वाकचौरे हे उमेदवारी अर्ज दाखल करेल यामुळे भविष्यात भाजप निर्णय पुर्वी रिपाई विचार करेल .
शिवसेना , राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले असल्याने त्यांची ताकद विभागली तर रिपाईचे मते आज ही  निर्णायक ठरणारे असल्याने भाजपा नेत्यांनी यांचे आत्मपरिक्षण करावे तर मनसे युतीत घेण्याचा एकचं उद्देश मुंबईतील मतदार हे होय .
४० वर्षापासून चळवळीत नि स्वार्थी काम करतो तेव्हा आम्ही पक्षाच्या अस्तित्वासाठी एकत्रीत जाणार व तिकिट वाटपात बौध्दाना संधी देण्यात न आल्याची  खंत आज बौध्द समाज्यात पसरली आहे .
यावेळी श्रीकांत भालेराव म्हणाले की रिपाई पक्ष हा देशात राज्यात असून तो चळवळीचा पक्ष आहे . देशभर महायुतीचा प्रचार करा सन्मान होईल असे वचन भाजपाने दिले मात्र आम्ही समाधानी नाही शिर्डीची जागा सोडावी हीचं आमची भूमिका हा रिपाई चळवळीचा  सामाजिक प्रश्न आहे .पक्षाची अस्तित्वाची लढाई आहे आता किती दिवस इतराचेचं ओझे वाहयचे . तर शिर्डी मतदार संघ राखीव झाला वेळोवेळी आमच्यावरचं अन्याय होत आहे . राखीव मतदार संघ होवून काही उपयोग आहे आता पर्यत झालेले खासदार निस्किय दिसले . देश पातळीवर आठवलेचा दबाब आहे . मोदीची ही इच्छा आहे आठवले पाहिजेल अजून वेळ गेली नाही तेव्हा उमेदवारीबाबत विचार करा असे बाळासाहेब गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली 
यावेळी भिमा बागुल यांनी सुत्रसंचालन केले . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed