श्रीरामपूर । झुंजार न्यूज
2009 शिर्डी मतदारसंघ मागसवर्गिया करिता राखीव झाला तरी सहकार सम्राटाच्या इशाऱ्यावरचं उमेदवार ठरवून वेळोवेळी आमच्यावरचं अन्याय झाला आहे . शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव होवून काहीचं उपयोग झाला नाही 2009 पासून झालेले खासदार निस्क्रिय ठरले त्यांनी नाही समाज्याचे , नाही मतदारांचा विश्वास संपादन केला . आज देश पातळीवर रामदास आठवले यांचा दबदबाव असून नरेंद्र मोदीसह वरिष्ठांची इच्छा आहे की , रामदास आठवले निवडून आले पाहिजेल मात्र स्थानिक नेत्यांचाचं विरोध असल्याने आठवले यांना शिर्डीतून उमेदवारी मिळू शकली नसल्याची खंत रिपाई जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड यांनी व्यक्त केली
२०२४ लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने याचं पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपा मित्रपक्षांनी केद्रींय मंत्री ना. रामदास आठवले यांच्याकरिता जागा न सोडल्याने निवडणुकीची रणनिती व शिर्डी व दक्षिण नगरमधून आंबेडकरी चळवळीतील उमेदवारी देण्याकरिता घेण्यात आलेल्या निर्धार बैठकीतून गायकवाड बोलत होते . बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव हे होते तर प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , उत्तर महा सचिव राजाभाऊ कापसे , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , विभागीय प्रमुख भिमा बागुल , सुभाष त्रिभूवन , रमेश शिरकांडे , धनजंय निकाळे , रावसाहेब बनसोडे , अनिल नन्नवरे , राजेंद्र गवांदे , राजू मगर , रमाबाई धिवर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी बाळासाहेब गायकवाड पुढे म्हणाले की , गेल्या १२ वर्षापासून रिपाई पक्षाची भाजपाशी मैत्री पुर्ण युतीचे संबंध असून केद्रींय मंत्री रामदास आठवले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नि:स्वार्थी व प्रामाणिकपणे मैत्रीचे संबंध जपले . मात्र पाहिजेल तसा तालुकास्तरीय , जिल्हास्तरीय सत्तेचा वाटा दिला गेला नाही तरी कार्यकर्त्यानी कुठल्याही प्रकारे आवाज उठविला नाही . शिर्डी लोकसभेकरिता वेळोवेळी जागा देण्याची मागणी स्वतः रामदास आठवलेसह कार्यकर्त्यानी केली मात्र स्थानिक नेत्यासह फडणवीस यांनी दुर्लक्षित केले काना मागून आले आणि तिखट झालेल्यांना महत्व दिले . तर बौध्द समाज्याला रामदास आठवले यांच्या रुपाने संधी मिळेल असे वाटले मात्र राजकिय नेत्याकडून हे दुर्लक्षित झाले त्यामुळे बौद्ध समाज नाराज झाल्याने कार्यकर्त्यचं नव्हे संपुर्ण बौद्ध समाज एकवटला . आता माघार नाही शिर्डीतून व दक्षिणेतून उमेदवार देण्याचा निर्धार झाला असल्याने अजून ही वेळ गेली नाही तेव्हा उमेदवारीबाबत फेरविचार करा असे बाळासाहेब गायकवाड शेवटी म्हणाले

यावेळी श्रीकांत भालेराव , विजयराव वाकचौरे , राजाभाऊ कापसे , दिपक गायकवाड , भिमा बागुल , सुभाष त्रिभूवन यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या

चौकट
दक्षिण नगर मधून विजय वाकचौरे तर शिर्डीतून भिमा बागुल अथवा दिपक गायकवाड यांचा रिपाईकडून निवडणुकीचा फार्म भरला जाईल . रामदास आठवले हे देशाचे नेते आहे स्थानिक पातळीवर भाजपाच्या नेत्याकडून मान – सन्मान मिळत नाही . यांना बौध्द समाज्याचे मते हवे मात्र बौध्द समाज्यातील लोकशाही प्रतिनिधी नको आता नाही ही अस्तित्वाची लढाई आहे समाज्यात जावू मते कशी मागायची तेव्हा शिर्डीच्या जागेवर आम्ही ठाम आहोत .
विजयराव वाकचौरे ( राज्य उपाध्यक्ष , रिपाई )
