{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

शिर्डी । झुंजार न्यूज

कोऱ्हाळे सारख्या खेड्यातील सर्व सामान्य आर्थिक  परिस्थिती असलेल्या घरातील विद्यार्थिनी प्रियंका कालेकर हिने गुणवत्तेच्या जोरावर पुणे येथील शासकीय बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून आपल्या आई-वडिलांचे मुलीला डॉक्टर करण्याचे स्वप्न पूर्ण केले.
प्रियंकाचे वडील राजाराम कालेकर हे साई संस्थानमध्ये कर्मचारी आहेत, तर आई सुरेखा या अंगणवाडी सेविका आहेत. तिच्या या यशाबद्दल तिच्या गावात, शाळेत आणि तेथील श्रीगणेश शैक्षणिक संकुलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
को-हाळे येथील श्रीगणेश शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रियंकाने गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळविले. श्री गणेश शिक्षण संस्थेत तिने विज्ञान शाखेत अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत देखील तिने ९५ टक्के गुण मिळविले. फिजिक्समध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळविले होते.
या दोन वर्षांत आम्ही तिची नीटची परिपूर्ण तयारी केली. या परीक्षेत तिला ५८५ गुण मिळाले. त्या आधारे तिला पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. आता तिने एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले.
चौकट
डॉ. प्रियंका कालेकर हिने 66 आई-वडिलांचे स्वप्न साकार केले, तसेच श्रीगणेश शैक्षणिक संस्थेचा नावलौकिक देखील वाढविला. तिचा भाऊ अनिकेत देखील इंजिनिअर झाला. या भावंडांना घडविण्यात त्यांच्या आई- वडिलांचा मोठा वाटा आहे. प्रा. विजय शेटे, अध्यक्ष, श्रीगणेश शैक्षणिक संस्था,
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *