{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

 

आश्वी । झुंजार न्यूज

शिवाजी महाराजांच्या काळातील हेरगिरासाठी बहिर्जी नाईक यांनी अनेक कला विकसित केल्याचे दाखले आपल्याला इतिहासात मिळतात. त्यांनी हेरगिरी करताना कधी पक्षाचे आवाज, कधी लोक कलेचा आधार तर कधी वेगवेगळ्या वाद्यच्या आवाजातून गुप्त संदेश देण्यात येत होते. अशीच एक लोककला म्हणजे करपावली कला, या कलेत दोन माणसे एकमेका पासून लांब उभी राहून फक्त हाताच्या बोटांनी खुणा करून एकमेकांची भाषा ओळखत असतात. सद्या पितृपक्ष सुरु असून संगमनेर तालुक्यातील आश्वी व परिसरात हि कला सादर करणारे मोट्या प्रमाणात फिरून पितरांच्या नावाने नावे ओळखून दोन पैसे कमावताना दिसत असून लोकांकडून ही या कलेला दाद मिळताना दिसत आहेत.

करपावली भाषा ही सद्या फक्त मुके किंवा बहिऱ्या माणसामध्ये खाणाखुणा करून बोलली जाते. हि शिवकालीन भाषा आजही काही लोक कलाकारांनी जपून ठेवली आहे. यामध्ये संभळ वाजवत आणि देवाचे नाव घेत हि कला सादर केली जाते. इतर वेळी देवीचे जागरण किंवा गोंधळ घालणारे हे कलाकार पितृ पक्षात अनेक भागात फिरताना आढळून येत आहेत. गळ्यात कवड्यांची माळ ,टाळ , तुणतुणं,आणि संभळ घेऊन हे कलाकार आपली कला सादर करत आहेत.

कोरोना काळात या कलावंतांची कोरोनामुळे मोठी आबाळ झाली असल्याचे या कालावंतानी सांगितले. हाताला कामी नाही मंदिरे बंद, कार्यक्रम बंद. त्यामुळे मोठी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. ही शिवकालीन , शिवलिप , मोडीलिपी म्हणून समजली जात होती बहिर्जी नाईक यांना या कलेच्या माध्यमातुन सर्व शत्रुमधील खबरी दिल्या होत्या व  छत्रपती शिवाजी महाराजानी स्वराज्याची स्थापना झाली होती . सप्तश्रुंगी देवीला जात असताना आश्वी व परिसरात ही कला सादर केली यातून लोकांची भावना व कला प्रेम दिसून आले ही कला आम्ही वाड – वडीलां पासून बालपणी जोपसल्याने  या कलेच्या माध्यमातून कुटुंब चालवितो मात्र कुंटुंब मोठे असल्याने भाग नाही त्यामुळे या शिवकालिन लोक कला शासनाने आर्थिक साहाय्य करावे अशी अपेक्षा जालन  ( अंबडगांव ) येथून आलेल्या अर्जून मोंगल शिंदे व विकास भागवत शिंदे या कलाकाराने पुढारीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.” 

यावेळी या कलाकारांनी अनेकांच्या बोटाच्या इशाऱ्यावरुन नावे सागितली त्याला लोकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली . शिबलापूर संरपच प्रमोंद बोंद्रे , पत्रकार राजेश गायकवाड , शरद बिडवे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *