शिर्डीची जागा न मिळाल्याची खंत : रामदास आठवले

मुंबई । झुंजार न्यूज

जो पर्यत जिल्हयातील भाजपा नेत्यांसह शिर्डी व दक्षिणेचे उमेदवार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्याशी राजकीय सखोल चर्चा होत नाही . तो पर्यंत आम्ही युतीच्या उमेदवारांच्या कुठल्याही प्रकारच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याच्या भावना कार्यकर्त्यानी रामदास आठवले यांच्या समोर मांडल्याने कार्यकर्त्याच्या भावना व नाराजी लक्ष्यात घेवून रामदास आठवले यांनी ही आपलाही सुर कार्यकर्त्याच्या सुरात मिळविला 

2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण उन्ह्याच्या कडाक्या प्रमाणे तापू लागले मात्र शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीकरिता रामदास आठवले यांची निवडणुक लढविण्याची इच्छा असताना ही भाजपाचे राज्यातील वरिष्ठांसह जिल्हयातील भाजपा वरिष्ठ नेत्यांनी जाणुन – बुजुन डावलल्याने संपुर्ण नगर जिल्ह्यातील कार्यकर्ता व बौद्ध समाज नाराज निर्माण झाल्याने युतीच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याची भूमिका घेतली असून मुंबई येथे रामदास आठवले यांच्या उपस्थितीत नुकत्याचं झालेल्या  बैठकीतून कार्यकर्त्यानी जिल्ह्यातील भाजपा नेते हे आम्हाला विधानसभा , जिल्हा परिषद , पचायत समिती व विविध शासकिय , निमशासकिय संस्थेत सन्मानाने संधी देत नसल्याच्या तिखट भावना व्यक्त केल्या .

तर आठवले यांना उमेदवारी न मिळाल्याने रिपाईच्या नाराज कार्यकर्त्यांनी शिर्डी व दक्षिण नगर लोकसभा मतदारसघातून उमेदवारी अर्ज भरण्याची ठाम भूमिका घेतल्याचे चर्चामधून दिसून आले गेल्या दोन तास चाललेल्या मंथन चर्चातून रामदास आठवले यांनी शांततेत कार्यकर्तेचे विचार ऐकूण घेतल्यावर रामदास आठवले म्हणाले की , आपली भाजपा – सेने बरोबर युती आहे . त्यामध्यमातून आपल्या पक्षाला शिर्डी , सोलापूर या दोन जागा मागितल्या होत्या मात्र राज्यातील नेत्यांच्या गोंधळात राज्यातील वरिष्ठांनी केंद्राला दिलेल्या यादी आपले नाव दिले नाही त्यामुळे आपल्या नावांचा विचार झाला नसल्याने आपला जागा मिळाल्या नाही ही चुक कोणची झाली हे आपलेला समजेलचं . दोन वर्षांपूर्वी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या नावांची चर्चा एका कार्यक्रमातून केली होती त्यामुळेचं माझी ही इच्छा जागृत झाली मात्र खायचे दात वेगळे , दाखयचे वेगळे म्हणीनसार त्या वरिष्ठ नेत्यांनी आपली भूमिका बदलल्याचे होणाऱ्या घडामोडीतून दिसून आले त्याच्यामुळे शिर्डी कडे जास्त लक्ष्य दिल्याने सोलापूरची जागा ही गेली तेल गेले , तूप गेले हाती धुपाटने आले म्हणत आठवले पुढे म्हणाले की , त्यांनी आपल्याबाबत बदललेली भूमिकामुळे संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांमध्य नाराजी पसरली आहे . 

यावेळी विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , बाळासाहेब गायकवाड , राजाभाऊ कापसे , दिपकराव गायकवाड , सुनिल साळवे , आशिष शेळके , माणिकराव यादव , रमेश शिरकांडे , अंकुश भैलुमे , अनिल नन्नवरे , विजयराव खरात , राजेंद्र गवांदे , संजय भैलुमे , धनजंय निकाळे , विकी कापसे , बाळासाहेब कदम , सिध्दार्थ खरात आदीसह जिल्हयातून मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *