{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

अहमदनगर । झुंजार न्यूज 

 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत १० ते २५ एप्रिल या समता पंधरवड्यात ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या वतीने देण्यात आली आहे ‌.

 

 

 

समता पंधरवड्यात ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेतील २०२३-२४ मधील सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेव्दारे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयांमार्फत अर्ज स्विकृत करुन सदर अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे आयोजन करण्यात येणार आहे. जेणेकरुन भविष्यात त्यांना तंत्रशिक्षण व व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेताना अडचणी येणार नाहीत.

 

 

जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी, सीईटी परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००००००००

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed