मांचीहिल । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांचीहिल या शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये झालेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये आश्वी केंद्रस्तरावर यश मिळवले आहे.
यामध्ये कार्तिक जालिंदर जोंधळे इयत्ता दुसरी १२२ गुण, स्वरा संतोष भुसाळ इयत्ता तिसरी २०८ गुण, समृद्धी शिवाजी साबळे २०८ गुण, प्रणव देविदास वाळेकर २०६ गुण, मृण्मयी गंगाधर चिंधे २०४ गुण ,श्रेयस बाळाराम सांगळे इयत्ता चौथी २०२ गुण, तीर्थराज विनीत थोरात १९४ गुण , राज संतोष वाबळे इयत्ता सहावी १५० गुण मिळवून आश्वी केंद्रामध्ये प्रथम, प्रसाद सिताराम कोटकर इयत्ता सातवी २३० गुण मिळवून आश्वी केंद्रात प्रथम आला.
या विद्यार्थ्यांचे संस्था प्रमुख शाळीग्राम होडगर ,संचालिका नीलिमा गुणे, प्राचार्य विजय पिसे , मुख्याध्यापिका योगिता दुकळे यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना हर्षबाला जगताप,अर्चना तांबे ,सारिका खेमनर ,नितीन गीते, बाबासाहेब गवते, सुनिल अंगरखे ,किशोर कार्ले , शशिकांत देशमुख ,ताई पवार, सविता सहाने,शिल्पा खेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
