१० वीच्या परीक्षेत ९०.१९% निकालासह निवेदिता कराड प्रथम
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ‘सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयाने’ इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेत (मार्च २०२६) आपल्या यशाची परंपरा यंदाही मोठ्या थाटात कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९०.१९ टक्के लागला असून, निवेदिता संदीप कराड हिने ९३.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
Oplus_131072
जाहीर झालेल्या निकालानुसार, विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये निवेदिता कराड (९३.४०%) प्रथम, कल्याणी परशराम जाधव (८७.४०%) द्वितीय, तर अक्षदा शाम पाबळ (८६.८०%) हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, मंगेेश शिवाजी खेडकर (८५.६०%) आणि पायल श्रीराम थोरात (७७.४०%) यांनी अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
Oplus_131072
विद्यालयाच्या एकूण निकालात गुणवत्तेचा दर्जा दिसून येत आहे. एकूण यशस्वी विद्यार्थ्यांपैकी: विशेष प्राविण्य (Distinction): ०८ विद्यार्थी प्रथम श्रेणी (First Class): १८ विद्यार्थी द्वितीय श्रेणी (Second Class): १५ विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन केले आहे.
Oplus_131072
“यश ही एकदाच मिळवण्याची गोष्ट नसून ती सतत करत राहण्याची प्रक्रिया आहे,” हे या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांचे जिद्द, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि कष्टकरी पालकांचा पाठिंबा या त्रिवेणी संगमामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना विद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे पानोडी परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .