नंदुरबार । झुंजार न्यूज
गांधी रिसर्च फाउंडेशन, लोकमत न्यूज नेटवर्क जळगावद्वारा आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा २०२३ च्या अंतिम मूल्यांकनासाठी श्री संत जनार्दन स्वामी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोल्हेवाडी यांची निवड झाली आहे.

गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक गिरीश कुळकर्णी, चंद्रशेखर पाटील व पाटील ,संजय जाधव यांनी प्राचार्य श्रीकांत माघाडे यांच्याशी संवाद साधत कमी वेळेत शाळेतील स्वच्छतेविषयी चर्चा व मार्गदर्शन केले. तसेच गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर स्पर्धेसाठी आवश्यक दस्तऐवजांची तपासणी केली. वर्षभरात राबवलेल्या सर्व उपक्रमांची नोंद घेतली.

शालेय परिसर, तसेच ओला व सुका कचरा यांचे विलगीकरणाबाबत समुपदेशन, प्लास्टिक कचरा संकलन,शालेय वर्गखोल्यांचे, स्वच्छतागृहांचे प्रत्यक्ष निरीक्षण,वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दिलेले स्वच्छता संदेश, स्वच्छता सप्ताह उपक्रमांचे निरीक्षण केले.प्राचार्य श्रीकांत माघाडे यांनी महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणारे पुस्तक भेट दिले व फेटा बांधून स्वागत केले.

तसेच विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी औक्षण करुन कुंकुमतिलक लावला.गिरीश कुळकर्णी, चंद्रशेखर पाटील यांनी चरख्यापासून बनवलेली सूत हार भेट देऊन प्राचार्य श्रीकांत माघाडे, प्रकल्प प्रमुख अरुण वामन,ज्येष्ठ शिक्षकेतर कर्मचारी बाळासाहेब गायकवाड यांचा सत्कार केला.

याप्रसंगी विद्यालयाचे कर्मचारी सुनील यादव,नरेंद्र गायकवाड उपस्थित होते.या उपक्रम यशस्वितेसाठी साठी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
