द अकादमी स्कूल (TAS) च्या विद्यार्थ्यांनीच केला वार्षिक अहवाल सादर

 

 

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा द अकादमी स्कूलचा अनोखा प्रयत्न

 

पुणे । झुंजार न्यूज 

 

पुण्याच्या द अकादमी स्कूल (TAS), येथे पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात बैठक आयोजित करून शिक्षक आणि पालकांना त्यांचे संबंधित शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे प्रगती अहवाल दाखवले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सार्वजनिक संवाद तसेच आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

 

 

प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रगल्भ करण्याचा आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्याचा प्रयत्न टास नेहमीच करत असते. हा उपक्रम छोटा शिशु, मोठा शिशु आणि बालवर्गातील विद्यार्थ्यांपुरता मर्यादित होता, ज्यांनी आपली वर्षभरातील कामगिरी सादर केली. आपल्या वर्षभरातील अभ्यासक्रमातून आपल्याला आवडलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांनी सांगितल्या. विद्यार्थ्यांचे हे अनोखे आणि उल्लेखनीय सादरीकरण पाहून पालकांना आनंद झाला.

 

 

शैक्षणिक वर्ष सुरु असताना अडचणींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पाठिंबा दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे देखील कौतुक केले. वर्षभरात आत्मसात केलेली नवीन कौशल्ये विद्यार्थ्यांनी दाखवली. यावेळी घडलेले मजेदार किस्से देखील विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच पुढील वर्षाच्या शिक्षकांसाठी देखील विद्यार्थ्यांनी संदेश दिले.

 

 

“या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांची प्राधान्ये, आवडी-निवडी, सामर्थ्य आणि कमकुवतपणा सामायिक केला. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच त्यांच्यात समन्वय निर्माण करणे हा या मागचा हेतू होता. मुलांना अशा कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेताना पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. तसेच विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षकांना आणि पालकांना खूप आनंद झाला,” असे द अकादमी स्कूल (टास), पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या.

 

 

 

प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची वार्षिक प्रगती यशस्वीरीत्या सादर केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. संस्कारक्षम वयात मनाची उत्तम जडणघडण करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा एकत्र सहभाग महत्वाचा असतो. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचं यश तर दिसून आलंच, पण त्याचसोबत हा एकत्र सहभागही अधोरेखित झाला.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed