आश्वी । झुंजार न्यूज 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय रायते येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
याप्रसंगी रायते गावच्या सरपंच सौ .रुपालीताई गौतम रोहम यांनी प्रतीमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी संगमनेर मार्केट कमेटीचे संचालक कैलाससेठ पानसरे ,  सोसायटीचे चेअरमन माधवराव खडे , माजी ऊपसरपंच भाऊसाहेब खडे, माजी चेअरमन भाऊसाहेब नवले , ग्रामपंचायत सदस्य चेतन मेने , जयदुर्गा माता पतसंस्था संचालक सचिन अरगडे, सुनिल सारबंदे ,  जयराम आरोटे , सचिन भांगरे, गौतम सिताराम रोहम उपस्थित होते 
यावेळी जि प शाळाची विद्यार्थिनी शरयु स्वप्नील कदम हीने डॉ बाबासाहेबाच्या शैक्षणिक धोरणाबाबतचे विचार मांडले . तसेच वाघापूर शांतीनगर परीसरामध्ये बौध्दराजे ग्रुपच्या वतिने बाबासाहेबांची जयंती शालेय वि‌द्यार्थि व महिलाच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्साहात सपन्न झाली .
यावेळी सुत्रसंचालन विनोद घोलप यांनी केले तर दिप प्रज्वलन संरपच सौ रुपालीताई गौतम रोहम यांच्या हस्ते झाले तर सौ डेंगळे, विमल घोलप ,  शितल घोलप , माजी सरपंच जिजाबाई जोर्वेकर , जया घोलप यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले 
यावेळी शाळेय वि‌द्यार्थिनी भाषण व गाणे सादर केले तर  विद्याधिनी शाळेय वह्या , पेन , पूस्तके वाटण्यात आले . 
यावेळी त्रिंबक शिंदे , मदन घोलप , सचिव जोर्वेकर, मंगेश भोसले, जयदिप घोलप , राजु घोलप, संदिप घोलप, राजु पावसे ,अनिल जोर्वेकर, पृथ्वी घोलप , भैय्या घोलप, रवि जोर्वेकर , सारंग जोर्वेकर , शेट्टी, योगेश भालेराव ,विकास घोलप , मिलिंद रोहम, खरात मिस्तरी, मायकल गायकवाड , सोनवणे दादा, गणेश भागवत, अरून रोकडे, संखेने उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed