पानोडी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ फाऊंडेशन व जुन्या – नव्या युवकांच्या पुढाकारातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी फटाकेच्या अतिषबाजीने व डॉ बाबासाहेब आंबेडकर च्या घोषणांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली तर रथ मिरवणुकीतून महिलांचा व तरुणांचा सफेद पेहराव आकर्षित ठरला .
यावेळी कदम वस्ती तर गावातील जुन्या ग्रामपचायत कार्यालयासमोरील स्मारकां पर्यंत फटाके अतिष बाजीने रथ मिरवणुक काढण्यात आली होती . डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ फाऊंडेशन व रिपब्लिकन पक्षाच्या जुन्या , नव्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत स्मारकासमोर दहा बाय वीसचा डिजिटल बॅनर बनवून लावला तर उभारण्यात आलेल्या झेंड्याच्या भोवती रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आल्याने एक आकर्षकतापणा येथे दिसून आल्याने दिसले . महिलासह तरुणांना सेल्फी व फोटो काढण्याचा मोह आवरला नाही . गेल्या तीन तासांच्या जल्लोष मिरवणुकीनंतर महा प्रसादाचे वाटप करण्यात आले .

यावेळी रिपाई तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम , नानासाहेब कदम , स्वप्नील कदम , जय कदम , भारत शेवाळे , संतोष सांगळे , जीवन कदम , मधुकर कदम , भावका कदम , राजेंद्र कदम , गणेश कदम , अमर कदम , सुनिल कदम , प्रकाश कदम , रामभाऊ कदम , पत्रकार राजेश गायकवाड , अस्लम सय्यद , जब्बार अशरफी , आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होते
