शिर्डी । झुंजार न्यूज
लोकशाही पध्दतीत होणाऱ्या निवडणुकामधून उमेदवारी करणाऱ्यांना मित्र – शत्रु नसतात ते कोणाला ही भेटून मदत मागू शकता , मदत करायची कि नाही हा त्यांचा अखेर निर्णय असतो . मी जिल्हयातील लेक असून तसेचं आमचे तिन पिढयाचे राजकिय , सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून अनेक परिवाराशी स्नेही संबंध असल्यानेचं विखेसह जिल्हयातील प्रत्येक कुटुंबाला भेट देणे हे माझे कर्तव्य असुन निवडणुकीच्या माध्यमातून मला सहकार्य करा हे सांगणे माझे हक्क आहे तेव्हा मी राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटले यात गैर काहीचं नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली .

शिर्डी लोकसभेतून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षा रुपवते प्रचारानिमित्ताने गावो गावी फिरत असून त्यांना लोकांमधून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे त्यामुळे त्यांचे पारडे जड होताना दिसत आहे . उत्कर्षा रुपवते ह्या कॉग्रेस पक्षाच्या तरुण पदाधिकारी होत्या . त्यांना शिर्डी लोकसभेतून निवडणुक लढविण्याची इच्छा असल्याने तीन वर्षापासून त्यांनी तयारी सुरु केली होती मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही परिणामी त्यांनी वंचितची साथ घेतली व निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या . त्या प्रचारानिमित्ताने शिर्डी येथे फिरत असताना त्यांना पत्रकारांनी विचारले की तुम्ही विखेची भेट घेतली म्हणून थोरात नाराज आहे असे विचारलेले असता त्यांनी पत्रकारासमोर आपली भूमिका मांडली .

उत्कर्षा रुपवते पुढे म्हणाल्या की , 2009 पासून आमची पिढी कॉग्रेसकडे उमेदवारी मागत असताना गेल्या १५ वर्षात आम्हाला उमेदवारी देवून सन्मान मिळाला नाही 2009 ला रामदास आठवले , 2017 ला भाऊसाहेब वाकचौरे , 2019 ला भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली ज्यांनी तीन पिढया साथ दिली त्यांना तुम्ही न्याय देवू शकले नाही यांची मनात खंत निर्माण झाली १५ वर्ष वाट बघितली आता नाही मनावर दगड ठेवून व लोकांच्या भावना विचारात घेवून निवडणुक लढविण्यासाठी पाऊल उचलले . त्यात प्रकाश आंबेडकरांना भेटले त्यांनी ही मनाचा मोठे पणा दाखवत वंचित ची उमेदवारी जाहिर केली त्यांचा अनुषगांने लोकांमध्ये उतरले गावो – गावी – वाड्या – वस्त्या जावून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या . वयोवृध्द , महिला अस्थेने जवळ येतात डोक्यावरुन हात फिरवितात , आशिर्वाद देतात व म्हणतात आता आमचा माणुस आला .

गेल्या १५ वर्षात कुठल्याही विकास सोडा साधं खासदार कसा आहे हे सुध्दा या माझ्या माणसांना माहित नसल्याचे मोठे आश्चर्य वाटत आहे ग्रामिण भागातील बेरोजगार तरुण वर्ग मोठ्या आशेने माझ्याकडे बघ आहे त्यांना सुध्दा वाटते की , ही बाई आपल्या नक्की नोकरी देईल अशी आवस्था बघवत नाही

तेव्हाचं मी विचार केला लोकांच्या कल्याणाकरिता या निवडणुकीतन मला मदत व्हावी यासाठी मी जिल्हातील प्रत्येक प्रमुख नेत्यांना भेटली होते त्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील होते ही बाब मी आदरणीय बाळासाहेब थोरात यांना ही सांगितलेली मात्र आज ते माझ्यावर टिका करतात तो त्यांचा अधिकार आहे.तसेच भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवबंध तोडलेले आहे हे शिवसैनिकांनी विसरू नका असे शेवटी सांगत वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना निस्वार्थीपणे मदत करा असे आवाहन केले

