काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांचा प्रचाराचा धडाका

 

सर्व सभांना महाराष्ट्रभर उस्फूर्त प्रतिसाद

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

संपूर्ण महाराष्ट्रभर उष्णतेबरोबर निवडणुकीचे वातावरण ही तापले आहे. राज्यात विविध राजकीय पक्षांच्या प्रचाराची धामधूम सुरू असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना सर्व लोकसभा मतदारसंघातून मोठी मागणी असून आमदार थोरात यांनी प्रचाराचा झंझावात कायम ठेवला असून त्यांच्या सभांना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

 

 

महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत असून पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ व दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात निवडणुका झाल्या यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी नागपूर, चंद्रपूर ,गडचिरोली, भंडारा ,गोंदिया, रामटेक या सर्व ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या सभा घेतल्या. त्या पाठोपाठ अमरावती, नांदेड ,हिंगोली येथेही भव्य सभा झाल्या. काँग्रेस पक्षाचे नेते खा.राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबर विविध बैठकांसह अनेक सभा मधून त्यांनी जनतेला मार्गदर्शन केले आहे. तर राज्य पातळीवर सातत्याने ज्येष्ठ नेते खा शरदचंद्रजी पवार ,मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, खा. संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत प्रचार सभांचा धडाका सुरू आहे

 

उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असल्यामुळे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार सह अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातही आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मोठ्या सभा घेतल्या असून नुकतेच नाशिक, धुळे, जुन्नर ,सासवड, पुणे ,कोल्हापूर, सांगली या ठिकाणीही प्रचार सभांचा धडाका कायम ठेवला आहे.

 

 

महाराष्ट्रातील फोडाफोडीचे राजकारण सर्वसामान्य जनतेला मान्य नसून काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ असलेले आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आहे. यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार असणारे आमदार थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शिक्षण ,रोजगार हमी असे अनेक महत्त्वपूर्ण खाते अत्यंत कार्यक्षमपने सांभाळले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद व राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि हिमाचल व गुजरातचे निरीक्षक पद ही सांभाळले आहे.

 

 

सहकार, शिक्षण आणि ग्रामीण विकास यावर प्रभुत्व असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पुरोगामी विचार जपला आहे .त्यामुळे महाराष्ट्रात ते लोकप्रिय असून त्यांच्या प्रत्येक सभांना मोठी गर्दी होत आहे.

 

अहमदनगर व शिर्डी मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी गावोगावी प्रचाराचे नियोजन केले असून या दोन्ही मतदारसंघासह राज्यभरातून महाविकास आघाडीला 40 जागा तर देशपातळीवर एनडीएला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास आमदार थोरात यांनी व्यक्त करताना देशात भाजपा विरोधी व महाराष्ट्रात महायुती विरोधी मोठी लाट निर्माण झाली असून शेतकरी कामगार बेरोजगार युवक महिला हे सर्व इंडिया आघाडीच्या बाजूने असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed