संगमनेर । झुंजार न्यूज

 

लोकसभेची निवडणूक ही देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. नगरपालिका व ग्रामपंचायत प्रमाणे ही निवडणूक अत्यंत काळजीपूर्वक घेऊन सर्वांनी काम करावे. ही निवडणूक लोकशाही वाचवणारी ठरणारी असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्यातून भाऊसाहेब वाकचौरे यांना सर्वाधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

 

संगमनेर मध्ये गणेश नगर सय्यद बाबा चौक विद्यानगर माळीवाडा या विविध ठिकाणी बैठकांमधून ते बोलत होते. यावेळी समवेत सौ.दुर्गाताई तांबे, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, पुरोगामी नेते हिरालाल पगडाल सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा , शिवसेनेचे अमर कातारी,नूर मोहम्मद शेख,डॉ दानिश, वैष्णव मुर्तडक आदींसह विविध पदाधिकारी होते.

 

यावेळी बोलताना डॉ तांबे म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. दरडोई कर्जाचा डोंगर वाढला आहे .मात्र वस्तुस्थिती न दाखवता प्रसार माध्यमांमधून फक्त मोदींची स्तुती केली जात आहे. खरे वास्तव वेगळे आहे.

 

देशात महागाई बेरोजगारीने कळस घातला आहे. धार्मिक तेढ निर्माण झाला आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. जो सरकारच्या विरोधात बोलतो त्याला तुरुंगात डांबले जात आहे. ईडी सीबीआयचा धाक दाखवून पक्ष फोडाफोडी केली जात आहे.महिला असुरक्षित आहेत. आणि रोजगार बंद पडत आहे.शेतीमालाला भाव नाही. शेतकरी सर्वसामान्य अस्वस्थ असलेल्या या देशात आता मतदार हुकूमशाही लादू पाहत असलेले भाजप सरकार हटवणार आहेत.

मतदान करणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असून मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी हा हक्क वाजवावा व लोकशाही संवर्धनासाठी काम करताना संगमनेर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन केले.

तर हिरालाल पगडाल म्हणाले की, वंचित ही भाजपची बी टीम आहे.मोदींची हुकूमशाही रोकने हे महत्त्वाचे काम आहे मात्र वंचित मुळे पुरोगामी विचारांचे मते विभागले जाऊ शकतात त्यामुळे मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले.

या बैठकांमधून विविध संघटनांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वाकचौरे यांना पाठिंबा दिला आहे

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed