डॉ.जयश्रीताई थोरात व इंद्रजीत थोरात यांनी ग्रामीण भागात  तर मा. आ.डॉ.तांबे व सौ.दुर्गाताई तांबे आणि शहरात बैठकांचा धडाका ठेवला



संगमनेर । झुंजार न्यूज 

 

होऊ घातलेली लोकसभा निवडणुक ही लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी असून काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात ही महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर प्रचाराची धुरा सांभाळत आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत जाऊन अत्यंत काटेकोरपणे प्रचाराचे नियोजन राबवले आहे.

 

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये युवक नेत्या कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात व इंद्रजीत भाऊ थोरात यांनी प्रचाराचा धडाका कायम ठेवला आहे तर संगमनेर शहरामध्ये माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी वार्ड निहाय बैठका घेऊन प्रचार यंत्रणा जोरदारपणे राबवली आहे.

 

यावेळी बोलताना मा.आ.डॉ. तांबे म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ काटेकोर नियोजन केले आहे. याचबरोबर ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी असून नागरिकांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन शिर्डी मतदारसंघातून सत्तेसाठी झालेली महायुती व भाजपच्या पराभवाची सुरुवात करावी असे आवाहन केले.

 

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, तरुण पिढीला दोन कोटी नोकऱ्यांची आमिष दाखवणारे हे मोदी सरकार म्हणजे फसवे सरकार आहे. शेतकरी, सर्वसामान्य, गोरगरीब, महिला यांना या सरकारने फसवले आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा असून फोडाफोडीचे व धार्मिकतेचे राजकारण महाराष्ट्रात चालणार नसून देशात इंडिया आघाडीचे व महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याने सर्वांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहन केले.

तर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की,मोदी सरकारच्या काळात महिला असुरक्षित झाले असून मनिपुर च्या घटनेने देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. पंतप्रधान महाराष्ट्रात दिवसा आड येत आहेत. विकास कामांसाठी वेळ नसणाऱ्या पंतप्रधानांनी आतापर्यंत महागाईवर एकही शब्द काढला नाही असेही त्या म्हणाल्या.

 

तर इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की संपूर्ण देशामध्ये भाजप विरोधी लाट निर्माण झाली आहे.यावेळी विविध गावांमधून भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारात झालेल्या सगळ्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed