शिर्डी । झुंजार न्यूज

2024 लोकसभा निवडणुकीमधील चौथा टप्पातील असणाऱ्या शिर्डी लोकसभा निवडणुकीकरिता अवघे दोन दिवस उरले असताना सुध्दा महायुतीतील महत्वाचा असणारा घटक पक्षातील रिपाई पक्षाच्या ४० वर्ष रिपाई चळवळीला योगदान देणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्याची अजून ही हेडंसाळ होताना दिसत असताना शिर्डी मध्ये शुक्रवारी दुपारी रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले येत असल्याने कार्यकर्ते हे स्वत:हून आपले गऱ्हाणे मांडण्यासाठी येणार असल्याचे चित्र दिसत आहे 
गेल्या दोन वर्षांपासून शिर्डीची लोकसभा निवडणुकी करिता रिपाई ची तयारी चालू होती मात्र राजकिय स्वार्थापोटी ही जागा रामदास आठवले यांना मिळवून दिली नाही त्यातून बौध्द समाज तथा रिपाई कार्यकर्ते यांच्या मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली . युती धर्मा प्रमाणे दिलेल्या उमेदवारांचे काम करायचे हे नियोजन असते मात्र शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली गेली . लोखंडे यांनी युती धर्म न पाळता विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , बाळासाहेब गायकवाड , राजाभाऊ कापसे , सुरेंद्र थोरात , दिपक गायकवाड या रिपाईच्या जेष्ठ नेत्यांना समावून घेतले नसल्याचे चित्र दिसत आहे .
{“remix_data”:[],”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}
गेल्या २० दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना या मतदार संघातून युती , आघाडी , वंचित यांच्यासह अपक्ष निवडणुकीत उतरले , यात वंचितच्या उत्कर्षा रुपवते व आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रचारात आघाडी घेतली मात्र सदाशिव लोखंडे यांच्याकडे स्वतः ची यंत्रणा नसताना सुध्दा त्यांची भिस्त ही विखे पाटील यांच्यावर आहे तर गेल्या ३५ – ४० वर्षाच्या जडण – घडणीत गावो – गावी , वाड्या वस्त्या येथे रिपाईचे कार्यकर्ते विखुरलेले असताना सुध्दा रिपाईच्या कार्यकर्त्याकडे लोखंडे यांनी दुर्लक्ष केले आहे लोखंडेच्या मनात हे सर्व वंचितकडे वळतिल असा गैरसमज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे . मात्र हा केवळ गैरसमज आहे तर रिपाईशी केवळ बौध्दचं नव्हे तर मराठा , मुस्लीम , आदीवाशी समाज जोडलेला असल्याने युतीच्या उमेदवारांनी हे हालक्या हाती घेवू नये .
वंचित , आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याने लोखंडेचे ढाबे दणाणले असल्याचे चित्र दिसत आहे तीन वेळेस मुख्यमंत्र्यांनी लोखंडेकरिता सभा घेतल्या तर अनेक मंत्र्यांनी सुध्दा सभा घेतल्या मात्र या प्रत्येक कार्यक्रम , सभा , प्रचार फेऱ्या यात रिपाईचा एक ही कार्यकर्ता दिसत नसल्याने लोखंडेच्या मनात भिती निर्माण झाली त्याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांना लोखंडे यांनी प्रचाराकरिता पाचरण केले आहे . शुक्रवारी रामदास आठवले शिर्डीत येत असून पत्रकार परिषदे व कार्यकर्ता मेळावा घेवून आपली भूमिका स्पष्ट करणार मात्र ज्यांनी ४० , ४० वर्ष पक्षासाठी योगदान दिले व एकनिष्ठ राहिलेल्यांना काय न्याय मिळणार ? हे समजेलचं !
चौकट 
रिपाई पक्ष हा अकोले ते नेवासा , कोपरगांव ते राहुरी असा प्रमाणात विखुरलेला आहे पँथरपासून ते रिपाई पक्षाला ४० वर्षांचा भक्कम पाया आहे . रिपाई वोट बँक ही निर्णायक भूमिका घेणारी असल्याने उमेदवारांनी राम भरोसे राहू नये , ही वोट बँक जिकडे जाईल त्यांचा विजयी निश्चित होतो तर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांतून जय श्रीराम , जय भवानी अशा एक ना अनेक घोषणा होतात मात्र जयभीमचा कोठे ही नारा होत नसल्याने समाज्यात नाराजी दिसून येत आहे .
तर कार्यकर्त्यांनी हे ध्यानात ठेवा निवडणुका होतात , येतात , जातात मात्र पक्ष हा कायम स्वरुपी तेथेचं असतो 
विजयराव वाकचौरे , ( राज्य उपाध्यक्ष रिपाई )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *