आश्वी । झुंजार न्यूज

लोकशाहीचा उत्सव आज खऱ्या अर्थाने मतदान करून साजरा होत आहे. लोकसभेसाठी आज राज्यातच चौथा टप्प्यासाठी मतदान आज पार पडत आहे यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आपल्या संगमनेरमधील जोर्वे गावामध्ये जाऊन त्यांनी मतदान केले आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी कांचन थोरात व कन्या जयश्री थोरात या देखील मतदान करताना पाहायला मिळाल्या. तर नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे यांच्या संपूर्ण तांबे कुटुंबियांनी देखील सह्याद्री महाविद्यालयात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आपला मतदानाचा हक्क बजावला. तर महिला उमेदवार म्हणून वंचित कडून आपले पहिल्यांदाच नशीब आजमावू पाहणाऱ्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी देखील अकोले शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. जाऊन त्यांनी मतदान केले आहे.
दरम्यान संगमनेरमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रांवरती तुरक अशी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी सात वाजल्यापासून हे मतदान सुरू झालं आहे. मतदान केंद्रांवर मतदारांना माहिती मिळावी म्हणून सूचना दर्शक फलक देखील लावण्यात आले आहेत.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात यावेळी तीरंगी लढत असून महायुतीचे सदाशिव लोखंडे, आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचितच्या उत्कर्षा रूपवते आपलं नशिब आजमावत आहेत. आता मतदार राजा मतपेटीत कुणाला आपला कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
4 जूनला नवीन सरकार हे लोकशाहीला जपणारे असेल- आ.बाळासाहेब थोरात
लवकरच मतदानाचे सर्व टप्पे पुर्ण होतील व 4 जूनला नवीन सरकार हे लोकशाहीला जपणारे असेल असे कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. लोकशाहीचा उत्सव हा सुरू असुन तो आनंदाने साजरा केला पाहीजे असे थोरात यांनी सांगितले आहे.
जास्तीत जास्त मतदान करा- उत्कर्षा रुपवते
लोकशाहीचा जागर साजरा करण्यासाठी सर्व मतदार राजांनी मतदानासाठी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करा असेही आव्हान केले असून मतदारसंघातील जनता युती आणि आघाडीच्या उमेदवाराला नाकारेल आणि माझा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed