संगमनेर । झुंजार न्यूज

 

संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाबरोबर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ने आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून वीस विद्यार्थ्यांना 80 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळाले असल्याची माहिती प्राचार्य सौ जेबी सिटी यांनी दिली आहे.

 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयू ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ने राज्य पातळीवर विविध पारितोषिक मिळवली आहेत. उत्कृष्ट निकाल, गुणवत्तेबरोबर या शाळेचे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होत असून अनेक विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे .स्वच्छ व सुंदर परिसरासह गुणवत्ता आणि निकालाची परंपरा जपताना 57 विद्यार्थ्यांपैकी यावर्षी 7 विद्यार्थ्यांना 90 %पेक्षा जास्त मार्क मिळाले आहे तर वीस विद्यार्थ्यांना 80 % पेक्षा जास्त मार्क मिळाले आहे.

 

 

यावर्षी श्रेयशी भारत जाधव हिने 96.60% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला. तर श्रेया समीर परदेशी हिने 92.60 % गुण द्वितीय क्रमांक मिळवला .सोहम गणेश आरगडे व तनिष्का प्रवीण गुंजाळ या दोन्ही विद्यार्थ्यांनी  92. गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

 

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ. शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा विवेक धुमाळ, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, प्राचार्य सौ. जे.बी. शेट्टी सर्व शिक्षक व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed