संगमनेर । झुंजार न्यूज
अमृतवाहिनी एमबीए मध्ये स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग कार्यरत असून या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर नोकऱ्या मिळाल्या आहेत. दरवर्षी देशभरातील अनेक कंपन्या संस्थेत येऊन विद्यार्थ्यांच्या इंटरव्यू घेत असतात याचबरोबर विविध सेमिनार इंटरनॅशनल कॉन्फरन्स चे आयोजन केले जाते. 2022 मध्ये राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र हा पुरस्कार या महाविद्यालयाला मिळालेला आहे.सुंदर हिरवाईचा परिसर , होस्टेलची उत्कृष्ट सुविधा, प्लेसमेंट कक्ष, क्रीडांगण, सुसज्ज ग्रंथालय ,भव्य अत्याधुनिक सोयीनुक्त इमारत,आयएसओ मानांकरांसह NAAC ची गुणवत्ता मिळालेल्या या महाविद्यालयात पीएचडी संशोधन केंद्र कार्यरत असून यामधून 30 विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहे .तर या महाविद्यालयात 8 प्राध्यापक पीएचडी धारक असून ते पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
ओंकार विलास शिंदे हा संगमनेर इंदिरानगर येथील असून त्याची नायजेरिया मधील रॉयल ब्ल्यू अकाउंटिंग सर्विसेस या आघाडीच्या कंपनीमध्ये वीस लाखाच्या पॅकेजवर निवड झाली आहे.
यावेळी सौ.शरयू ताई देशमुख म्हणाल्या की, प्रत्येक पालकाचे एक स्वप्न असते की आपल्या मुलाने शिकून मोठी नोकरी मिळवावी. विशेषता परदेशी जाऊन नाव कमवावे .ओंकार शिंदे हा संगमनेर मधील सामान्य कुटुंबातील असून पालकांचे स्वप्न पूर्ण करताना 20 लाखाचे पॅकेज मिळून त्याने इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. ध्येय समोर ठेवले आणि परिश्रम केले तर तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
ओंकार शिंदे यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर प्रा. व्ही. बी धुमाळ, डॉ जे बी गुरव संचालक डॉक्टर बी एम लोंढे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
