संगमनेर । झुंजार न्यूज
उच्च शिक्षणानंतर नोकरीसाठी होणारी धावपळ वाट्याला न येता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ई.अॅण्ड टी. सी. विभागातील 74 पैकी 70 विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच नोकर्या मिळणे ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रीया प्राचार्य डॉ़ एम़ ए़ व्यंकटेश व विभाग प्रमुख डॉ़ आर.पी.लबडे यांनी व्यक्त केली़
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आय.टी. आणि इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी कंपन्यांना लागणारे कौशल्यपूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षमतेमुळे अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या इंजिनियर्सला जगभरातील नामांकित कंपन्यांकडून मागणी होत आहे़ या क्षेत्रातील गतिमान विकासाच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानातील गरजा ओळखून अमृतवाहिनी व्यवस्थापनाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य करार केलेले आहेत़ महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जपान व जर्मन भाषेवर प्रभुत्व मिळवले आहे़ यासाठी महाविद्यालयाने ‘सकुरा’ हे जपानी भाषेच्या वाढीसाठी केंद्र विकसीत केले आहे़ या वर्षीच्या प्लेसमेंटस् मध्ये मुलभुत इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचा सर्वाधिक समावेश असल्याने विद्यार्थी व पालक वर्गामध्ये भावी शाश्वत करिअरबद्दल समाधान व्यक्त होत आहे़ आय.टी. क्षेत्रातील कंपन्यांच्या अल्प कर्मचार्यांकडून काम करण्याच्या धोरणामुळे सद्यस्थितीतील प्लेसमेंट मध्ये तेजी कमी जाणवत असल्याने टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये मागणी वाढत आहे़ इलेक्ट्रीक वाहने, सेमिकंडक्टर चीप डीझाईन, वाहन उद्योगातील अद्ययावत तंत्र-ाान, इंण्डस्ट्री 4.0 तंत्र-ाान या सर्व बाबींमुळे ई.अँण्ड टी़ सी़ च्या विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळत आहेत.

ई.अँण्ड टी़ सी़ विभागातील कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी, इंन्टर्नशीप, मुल्यवर्धक कार्यक्रम, स्कील डेव्हलपमेंट कोर्सेस, प्रकल्प स्पर्धा, माजी विद्यार्थी संवाद, कंपन्यांतील त-ाांचे मार्गदर्शन या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांची तांत्रिक व वैयक्तीक तयारी होण्यास मदत झाली आहे, परिणामी प्लेसमेंटची संख्या वाढत आहे़

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा़ महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ़ सुधीरजी तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अॅकेडेमिक्स डॉ़ जे़ बी़ गुरव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ एम़ ए़ व्यंकटेश, रजिस्ट्रार प्रा़ व्ही़ पी़ वाघे, विभाग प्रमुख डॉ़ आर.पी.लबडे, प्लेसमेंट अधिकारी प्रा़ पी़ बी़ वाकचौरे, प्लेसमेंट विभाग समन्वयक प्रा़ व्ही़ आर.आवारे यांनी अभिनंदन केले आहे़

