अहमदनगर जिल्ह्यातील पहिले केंब्रिज स्कूल
संगमनेर
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम केंब्रिज स्कूल असून IGCSE बोर्ड परीक्षेच्या प्रथम बॅचचा 100% निकाल लागला असल्याची माहिती प्राचार्या अंजली कन्नावार यांनी दिली आहे.

संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेचे केंद्र ठरलेले अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल हे अहमदनगर जिल्ह्यातील केंब्रिज शी संलग्नित पहिले स्कूल ठरले आहे. केंब्रिज विद्यापीठाशी आधारित अभ्यासक्रम तसेच विविध अभ्यास प्रक्रियांचे आयोजन स्कूलमध्ये करण्यात येते व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.

१००% लागला आहे.
माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलने शालेय उपक्रमाबरोबर आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी (IGCSE )स्कूल मधून 27 विद्यार्थी बसले होते,सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले असून एकूण निकाल 100% लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले आहेत. यामध्ये मुंगसे प्रीती दत्तात्रय हीने 92.33% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे, तसेच देशमुख शिवराज संजय याने 92% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला व वाघे संस्कृती विजय हीने 91.33% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. जे.बी. गुरव, प्रा. व्ही. बी.धुमाळ, प्राचार्या अंजली कन्नावार आदीसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे
