आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर परिसरातील आश्वी – शिबलापूर रस्त्या लगत असणाऱ्या राजेंद्र दिनकर घुगे या शेतकऱ्यांच्या घराशेजारील पुर्वे दिशाकडील एका छोट्या पोल्ट्री फार्ममध्ये शंभरपेक्षा जास्त असणाऱ्या गावरान कोंबड्यावर बिबट्याने हल्ला चढविल्याने मृत्युमुखी पडल्या. ही घटना शनिवारी पहाटे घडल्याचे उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .

 

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील राजेंद्र दिनकर घुगे या तरुण शेतकऱ्यांनी आश्वी – शिबलापूर रस्त्यालगत आपल्या कुटुबांच्या उदरनिर्वाहाकरिता बऱ्याचं वर्षापासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे यासाठी दोनशे ते अडीचशे गावरान कोंबड्या आणल्या होत्या. शेतमजुरी करण्याबरोबरच कुक्कुटपालनाचा जोडधंदा करण्याचा घुगे यांचा प्रयत्न असून आपल्या घराच्या पुर्वेकडील शेतीच्या बाजूलाचं एक छोटेसे २० बाय २० चे शेडमध्ये शंभरपेक्षा जास्त गावरान कोबडया होत्या १० ते १२ दिवसाने त्यांची विक्री करायची होती मात्र शनिवारी सकाळी शेडमध्ये गेले असता, सर्वच्या सर्व कोंबड्या मृतावस्थेत आढळल्याने घुगे हतांश झाले त्यांनी तत्काळ संरपच प्रमोद बोन्दे व वनाधिकारी हरिचंद्र जोजर व पशुवैदयकिय आधिकारी शिवाजी फड यांना घटनेची माहिती दिली . या घटनेमध्ये यांचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

 

या झालेल्या घटनेमधील कोबडी मृत्यु झाल्यास वनविभाग व पशु संवर्धन विभाग जबाबदारी घेत नसल्याच आढळून आल्याने लाखो रुपयेचे झालेल्या नुकसानी बाबत या शेतकऱ्यांनी दाद कोठे मागायची  घटनास्थळी वनाधिकारी यांनी भेट दिली मात्र पशु आधिकऱ्यांनी भेट दिलाचं नाही त्यामुळे मृत कोबडया दिवसभर ठेवून अखेर रात्री उशिरा पर्यत पंचनामाविनाचं घुगे यांनी मृत पक्षाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. या घटनेत राजेंद्र घुगे या युवकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित विभागांकडून आर्थिक मदतीची मागणी केली आहे”

चौकट
दोन – चार दिवसापुर्वी या परिसरात बिबट्यांनी दररोज चकरा मारल्या होत्या . शेड शेजारी असणाऱ्या लिबांच्या झाड्याच्या सहाऱ्यांने त्यांनी शेडमध्ये प्रवेश करुन कोबडया मारल्या 
राजेंद्र घुगे ( शेड मालक शिबलापूर )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed