आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी व परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीपुरक व्यवसाय म्हणून गावोगावी कुकुट पालन व्यवसाय सुरु झाल्याचे दिसून आले आहे मात्र कुकुट पालक नियम धांब्यावर ठेवून व्यावसाय करतात मात्र पक्षांची विक्री अथवा पक्षी मेल्यानंतर त्याची विल्हेवाट व्यवस्थित न केल्याने त्यांच्या या हलगर्जीपणामुळे माशांची निर्मिती होवून या माशांचा ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो . प्रत्येकांच्या घरोदारी माशांचे मोठे थैमान दिसून येते माणसांच्या प्रत्येक हालचालीवर त्यांच्य अडसर निर्माण होताना दिसत असल्याने व संध्याच्या उष्णघातीने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांमध्ये रोगराई पसरण्याच्या भीती निर्माण झाली आहे.

पानोडी, हजारवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात
कुक्कुटपालनाचे व्यवसाय सुरू असून नियमाचे पालन न करताही सर्रास कुक्कुटपालनाचे काम सुरू आहे. या कुक्कुटपालनाच्या मेलेल्या कोंबड्यांची विल्हेवाट व्यवस्थितपणे होत नसल्याने त्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील लोकांना याचा त्रास होताना दिसत अहे. मात्र, याची काळजी कुक्कुटपालन व्यावसायिकांना अजिबात नाही. नियमांचे उल्लंघन करून सर्रास कुक्कुटपालन व्यवसाय सुरू असल्याचे दिसत आहे मात्र या व्यवसायाकडे कुठल्या प्रकारे नियम दिसून येत नाही . कुकुट व्यावसायिक हा मेलेल्या कोबड्यांची व रोजच्या निघणाऱ्या घाणीची कोठे व कशी विल्हेवाट लावतो , कोबडयांची विक्री झाल्यावर त्या जागेची स्वच्छता कशी होते , हे सर्व ग्रामपचायतीकडून पाहणी होते का ? हाचं मोठा लोकांनी उपस्थित केला प्रश्न आहे .

गेल्या अनेक वर्षांपासून कुकुटपालनाचा व्यवसाय सुरू असून प्रत्येक वर्षी एप्रिल – मे महिन्यात संपूर्ण गावांवर माशांचे साम्राज्य निर्माण होताना दिसत आहे या दोन महिन्यामध्ये दुर्गधी , माशांनी लोक त्रस्त होताना दिसत आहे अन्न पाण्यावर मन लागत नाही यातून आजारा निमत्रंण मिळताना दिसत आहे लहान लहान मुलांना दवाखान्यात घेवून जाण्याशिवाय पर्याय राहत नाही यातून आर्थिक टंचाई निर्माण होत आहे .

यावर्षी तर मोठ्या प्रमाणात उष्णघातकी वातावरण निर्माण झाल्याने झाडाचा अथवा घराचा सहारा घेण्यास भाग पडत आहे . प्रत्येक क्षणो क्षणी माशांशी लोकांना सामना करावा लागत आहे . अन्न पाण्यावर माशांचा थैमान दिसून येत असल्याने आजाराला निमत्रंण दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे . कुकुट व्यावसायिक , ग्रामपचायत यांच्या हलगर्जीपणामुळे लोक माशांनी त्रस्त झाले आहे या कुकुट व्यावसायिकावर त्वरीत कारवाई करुन या माशांचा त्वरीत बदोबस्त करा अन्यथा उपोषणास बसणार असा इशाराचं आता ग्रामस्थ देवू लागले आहे .

