आश्वी । झुंजार न्यूज
उच्च शिक्षित सधन कुटुंबातील २५ वर्षीय मुमुक्षु कु प्रतिक्षा भंडारी संसार सुखाचा त्याग करुन जैंन भगवती दिक्षा घेऊन रविवार ९ जुन रोजी आश्वी येथे जैंन साध्वी जीवना चा स्वीकार करत आहे. उपाध्याय जैंन संत प्रवीण ॠषीजी महाराज चा उपस्थित धार्मिक अनुष्ठान करण्यात येणार असुन या वेळी देश भरातील साधु साध्वी च्या उपस्थितीने आश्वी येथे साधु संतांचा मेळा भरल्याची अनुभुती येत आहे.

आश्वी बुद्रुक येथील सुशील रामचंद्रजी भंडारी यांची इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर असलेली मुलगी मुमुक्षु कु प्रतिक्षा सुशील भंडारी वय २५ हि मनात वैराग्य भावना निर्माण झाल्याने आत्मकल्याना साठी घर परीवारा संपत्ती सह संसार सुखाचा त्याग करत जैंन साध्वी वेश धारण करुन जैंन धर्माचा पाच महाव्रत अहिंसा ,सत्य , अस्तेय ,ब्रम्हचर्य अपरीग्रह या पध्दतीचे संन्यासी जीवन स्वीकारणार आहे. तिचा दिक्षा महोत्सव ३१ मे पासुन सुरु झाला असुन दररोज हाजारो भाविक उपस्थित राहत असुन ९जुन रोजी सुमारे १५ हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत जैन श्रमणसंघाचे उपाध्याय जैंन साधु प्रवीण ॠषीजी महाराज हे चतुर्विध संघाचा उपस्थित भगवती दिक्षा देणार आहेत. या वेळी उपाध्याय प्रवर प्रवीण ॠषीजी महाराज ,मधुर कंठी तीर्थेशॠषीजी महाराज, प्रखर व्याख्याता लोकेश ॠषीजी महाराज , उपप्रवरतिनी. चन्दन बालाजी महाराज, बुलंदवानी पदमावतीजी महाराज उपप्रवरतिनी साध्वी सन्मतीजी महाराज व साध्वी वृंद, जिनशासन गौरव सुनंदाजी महाराज व साध्वी वृंद, सेवाभावी किर्तीसुधाजी महाराज,कैवल्यधाम प्रेरक कैवल्यरत्नाश्रीजी महाराज, मधुर व्याख्याता विश्वदरशनाजी महाराज,राजस्थान विरांगना जयश्रीजी महाराज, सह मोठ्या संख्येने साधु साध्वी संत व देशभरातून मोठ्या संख्येने जैंन बांधव हजेरी लावत आहे.

रविवार ९जुन चा दिक्षा महोत्सवा साठी सुमारे तीस हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला असुन प्रत्येक भाविकाला कार्यक्रम पाहाता यावा यासाठी व्यवस्था करण्यात आली असुन अध्यात्म, संस्कृती,धर्म व उत्सव याचा अनोखा संगम आश्वीत झाला आहे.

या दिक्षा महोत्सवास उपस्थित राहाण्याचे आवाहन जैंन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी, विनीत गांधी , योगेश रातडीया यांनी केले आहे.
