राज्यात 13 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी

संगमनेर । झुंजार न्यूज 

महाविकास आघाडी मधील प्रमुख नेते व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून 13 जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे .तर उत्तर महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला मोठे घवघवीत यश मिळाले असून आठपैकी सहा जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार  विजयी झाले आहेत.

आठराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठी राजकीय धामधूम झाली. भाजपाने चारशे पार चा नारा दिल्यानंतर इंडिया आघाडीने देशभरात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मुसंडी मारली.

महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची लढत झाली .देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील ,पृथ्वीराज चव्हाण, खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख नेतृत्वात महाविकास आघाडीने 31 जागा जिंकल्या आहेत.

 काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हे शांत, संयमी व अभ्यासू नेते आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचा मोठा चाहता वर्ग असून त्यांनी विदर्भात नागपूर, गडचिरोली ,रामटेक, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तर मराठवाड्यात नांदेड, परभणी ,हिंगोली, जालना, औरंगाबाद, बीड ,पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर, सांगली ,सातारा ,पुणे ,शिरूर, हातकणंगले ,मुंबई ,ठाणे ,पालघर, या ठिकाणी जोरदार प्रचार सभा घेतल्या.

 त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळताना जळगाव, धुळे ,जळगाव ,नंदुरबार, नाशिक दिंडोरी, अहमदनगर व शिर्डी मतदार संघातही जोरदार प्रचार यंत्रणा राबवली

उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आमदार थोरात यांच्यावर असताना त्यांनी अत्यंत काटेकोरपणे प्रचाराचे नियोजन करून आपली यंत्रणा कामाला लावली. यामुळे आठ पैकी सहा जागांवर मवीआला मोठे यश मिळाले आहे. नंदुरबार मधून काँग्रेसचे ॲड. गोवल पावडी हे सर्वात मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे .तर धुळ्यामधून माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव ह्या विजयी झाल्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्राची लक्ष लागून असलेल्या अहमदनगर दक्षिण मध्ये जायंट किलर ठरलेले नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे सुजय विखे यांचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. याचबरोबर शिर्डी मधून भाऊसाहेब वाकचौरे यांनी विद्यमान खासदार लोखंडे यांचा पराभव केला. शिर्डी व अहमदनगर मध्ये काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची प्रचार यंत्रणा मोठ्या पद्धतीने काम करत होती. याचबरोबर नाशिक ,धुळे ,दिंडोरी आणि नंदुरबार मध्येही आमदार थोरात यांची यंत्रणा कार्यरत होती.

नाशिक मधून राजाभाऊ वाजे हे विक्रमी मतांनी निवडून आले. तर दिंडोरी मधून भास्करराव भगरे हे निवडून आले. हे सहा उमेदवार निवडून आणण्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, विविध पुरोगामी पक्ष यांचे कार्यकर्ते पदाधिकारी व नेते यांनी मोठे परिश्रम घेतले

या सर्वांना मार्गदर्शन करून प्रचाराचे काटेकोर  नियोजन करणारे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

आमदार थोरात यांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेस पक्षाला 13 जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळत असून महाराष्ट्र हे काँग्रेस विचारांचे राज्य आहे ते पुन्हा सिद्ध झाले आहे.

 संपूर्ण देशांमध्ये आता भाजपा विरोधी मोठी लाट निर्माण झाली असून आगामी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल असा विश्वासही आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयात मोलाचा वाटावर उचलणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेचे माजी प्रदेशाध्यक्ष व मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed