आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेचे आश्वी इंग्लिश स्कूल,विद्यालय यां शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. रयत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे १९७७ ते १९७८ जवळपास ४५ वर्षानंतर शिक्षण घेतलेल्या माजी ३५ विद्यार्थी कुटुंबासहीत विद्यार्थ्यांचा मेळावा बुधवारी विठ्ठल मंदिर आश्वी बु येथे आयोजित करण्यात आला होता. या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. सकाळी ९ वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी तान्हाजी गायकवाड भगवान इलग मारुती उंबरकर राजेंद्र डेंगळे, पांडूशेठ उंबरकर, शिवाजीराव गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी हा माजी विद्यार्थी चा मेळावा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यानंतर सर्वानी आपला परिचय करून दिला त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थी बाहेर गावावरून मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्यार्थी यांनी व्यक्त केली

यावेळी प्रमुख पाहुणे शाळीग्राम होडगर साहेब, भाऊ पाटील गायकवाड, विनायकराव बालोटे, भगवानराव इलग तसेच झावरे सर, पाटणी सर, लोहारकर सर, शिरसाठ सर, देसाई सर,गमे सर,उदावंत शिपाई मामा, बर्डे सर, शहाणे सर, पत्रकार अमोल राखपसरे आदी विविध क्षेत्रात काम करणारे अनेक माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित होते तसेच वाकचौरे सरांच्या अनु उपस्थितीची जाणीव झाली यामुळे सरांच्या निवासस्थानी यांचा सत्कार करण्यात आला यां सर्व कार्यक्रमात विशेष सहकार्य शिवाजीराव गायकवाड यांचे लाभले.

