संगमनेर । झुंजार न्यूज
सध्या पालकांचा खाजगी शिक्षण संस्थेकडे असलेला वाढता कल हाभविष्यकाळात जिल्हा परिषद शाळांच अस्तित्व टिकवण्याचा ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे स्पष्ट प्रतिपादन जनसेवा मंडळाचे अध्यक्ष सा कार्यकर्ते भारत पा गिते यांनी पिंपरी लौकी अजमपुर येथील आदर्श जिल्हा परिषद केंद्र शाळा मधील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप व नवगाताचेस्वागताच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ संगीता भारतराव गीते होते तर व्यासपीठावर उपसरपंच बाजीराव गीते भाऊसाहेब पाटील लावरे आदर्श शिक्षक दातीर गुरुजी .सिताराम पाटील दातीर नवनाथ लावरेभाऊसाहेब मुंडे प्रदीप गीतेबाबासाहेब गीते स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य मुख्याध्यापक बिडवे सर सह मुख्याध्यापक खेमनर सर पर्वत सर आदि
उपस्थित होते .

याप्रसंगी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आला

पुढे बोलताना गिते म्हणाले शिक्षण हे वाघिणीचेदूध असून त्याचा पाया हा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणापासून होतो ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च करून अद्यावत डिजिटल अशा जिल्हा परिषदेच्या शाळा निर्माण केले आहे त्याचाच एक भाग म्हणून गावातील केंद्र शाळा सह सर्व वस्ती शाळा डिजिटल बनवले आहे मात्र पालक वर्ग हा चुकीच्या माहितीद्वारे गडगंज फी भरून खाजगी शाळा कडे कल वाढल्याचे दिसत आहेही बाब भविष्यकाळाच्या दृष्टीने अतिशय घातक असून गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण बंद होईल अशी परिस्थिती सध्या प्रत्येक खेडूपाड्या दिसत आहे आजही पटसंख्या कमी झाल्यामुळे कित्येक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याची मानसिकता शासनाची होत आहे बऱ्याच ठिकाणी याबाबत पालकांमध्ये जागृती करू नये गावच्या गावामधून खाजगी संस्थांकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी विद्यार्थिनी जात आहे आजही ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार अशी शिक्षण दिले जाते मात्र स्पर्धेमधून माझ्या पाल्याला बाहेर चांगलं शिक्षण मिळेल या भावनेतून पालक आपली मुलं बाहेर गावाच्या बाहेर पाठवत आहे ही बाब भविष्यकाळाच्या दृष्टीने अतिशय घातक असून प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या गावाचं गाव पण टिकवण्यासाठी व गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा व त्यांचा अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करावी असेआव्हान त्यांनी केले

याप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली नवीन विद्यार्थी विद्यार्थिनींना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बिडवे सर यांनी केले तर आभार खेमनर सरयांनी मानले

