नाशिक । झुंजार न्यूज

केंद्रीय सामाजिक न्याय व समाजकल्याण राज्यमंत्री तथा रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष ना . रामदास आठवले यांचा केंद्रातील मंत्रीमंडळात तिसऱ्यांदा मंत्रीमंडळात समावेश झाल्याबद्दल अहमदनगर रिपाईच्या वतीने नाशिक येथे सत्कार करण्यात आला .
गुरुवार दि 20/06/2024 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मंत्रीमंडळातील समावेशानंतर नाशिक येथे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले असताना अहमदनगर जिल्हयातील कार्यकर्त्यांनी नाशिक येथे जावून ना रामदास आठवले यांचा सत्कार करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
यावेळी रि पा ई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश भाऊ लोढे , उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश आण्णा भैलुमे , अ नगर जिल्हा संघटक कुंडलिक गंगावणे , कर्जत युवक तालुकाध्यक्ष सतिश भाऊ आल्हाट , उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडीचे अध्यक्ष वंदेश गंगार्डे , प्रा. अमोल देवळे सर उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *