विवेक कोल्हे यांचा वाढता पाठिंबा विरोधकांना धडकी भरवणारा

 धुळे । झुंजार न्यूज

नाशिक शिक्षक विभाग मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून विवेक कोल्हे हे उमेदवारी करीत असून विवेक कोल्हे यांना मतदार संघातील पाचही जिल्ह्यांमध्ये टीडीएफ सह अनेक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. आणि आता नुकताच धुळे येथील टीडीएफ संघटनेने कोल्हे यांना पाठिंबा दिला आहे.
धुळे येथील टीडीएफ संघटनांच्या वतीने दिलेल्या पाठिंबाच्या पत्रकात सचिव आर.आर. साळुंखे यांनी म्हटले आहे की , सुसंस्कृत, युवा व संघर्षमय नेतृत्वाचा वारसा असणारे उमेदवार अपक्ष विवेक कोल्हे हे नाशिक शिक्षक विभाग निवडणुक लढवत आहे . त्यांची विचारसरणी ही पीडीएफ च्या विचारसरणीची सुसंगत आहे. सध्या शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या व शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. यात मुख्यत्वे जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदान , नवीन शिक्षक भरती, शिक्षकांना दिली जाणारी शैक्षणिक कामे, संच मान्यता मतदार संघाची निवडणूक असे अनेक महत्त्वाचे प्रश्न लढवत आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची विवेक कोल्हे यांनी प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात म्हणजे जाहीरनाम्यात सांगितले आहे. त्यामुळेच धुळे जिल्हा पीडीएफ संघटनांच्या वतीने आपण त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत.
विवेक कोल्हे यांनी प्रचार यंत्रणा कमी कालावधीतच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचली आहे. टीडीएफ या महत्त्वाच्या संघटनांसह अनेक महत्त्वाच्या संघटनांनी कोल्हे यांच्या नेतृत्वाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा पाठिंबा विरोधकांना धडकी भरवणारा व कोल्हे यांच्या विजयाचे प्रतीक आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *