सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा आंतरराष्ट्रीय योगदिन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडासंकुलात उत्साहात साजरा.

संगमनेर । झुंजार न्यूज

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये साजरा मोठ्या उत्साहात करण्यात आला.

याप्रसंगी  सह्याद्री शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.सुधीर तांबे मार्गदर्शन करताना, आपल्या शारीरिक ,मानसिक क्षमता विकसित होऊन शरीर आणि बुद्धी विकसित करण्याचे काम योगा प्रात्यक्षिके करत असतात. भारताने जगाला आयुर्वेद आणि योगा ही अनमोल देणगी दिलेली आहे. शरीर लवचिक बनवण्याचे काम योगातून होते .आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडाशिक्षक श्री के डी देशमुख सर आणि प्रा.भारत शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना योगदिनाची माहिती विशद करून विविध प्रात्यक्षिके सादर केली.
या योगदिनास कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवर अतिथींचा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी  संस्थेचे चेअरमन डॉ.सुधीर तांबे, सह सेक्रेटरी श्री दत्तात्रय चासकर सर, रजिस्ट्रार श्री बाबुराव गवांदे सर,पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब गुंड साहेब, विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री के जी खेमनर सर, उपप्राचार्य श्री सुरसे सर ,उपमुख्याध्यापक श्री वाळे सर, पर्यवेक्षक श्री पवार सर, श्री डोके सर , क्रीडाशिक्षक श्री मिलिंद औटी,श्री के डी देशमुख , श्री शकील शेख सर, प्रा.श्री भारत शिंदे सर , तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक वृंद, आणि विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर सेवक वृंद आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विरेश नवले सर यांनी तर आभारप्रदर्शन  विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री के जी खेमनर सर यांनी केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *